रस्ते कामांची पंचायतराज समितीकडे तक्रार

रस्ते कामांची पंचायतराज समितीकडे तक्रार

जानोरी । वार्ताहर Janori

दिंडोरी तालुक्यातील ( Dindori Taluka ) रस्त्यांच्या निकृष्ट व अपुरे कामे अन दुरावस्थेबाबत पंचायत राज समितीला ( Panchayat Raj Samiti )महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS )वतीने उपजिल्हाध्यक्ष मनोज ढिकले व पदाधिकारी यांनी निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, दिंडोरी तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत वाईट दुरवस्था झाली आहे. तालुक्यातील जनता खराब रस्त्यांमुळे त्रस्त झाली आहे. दिंडोरी या तालुक्याच्या मुख्यालयाला जोडणार्‍या दिंडोरी- पालखेड, दिंडोरी - खेडगाव, दिंडोरी - भनवड, दिंडोरी -ननाशी, दिंडोरी - उमराळे, दिंडोरी - ओझर आदी या सर्वच रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. याबाबत गेल्या 3 वर्षांपासून अनेकदा निवेदने, आंदोलने करुन झाली. परंतु प्रशासनाने याकडे कायम दुर्लक्ष केल्याने जनता हतबल झाली आहे.

दिंडोरी- पिंपळगाव, पालखेड- जोपुळ व वरखेडा-कादवा कारखाना या रस्त्यांचे मागच्या वर्षी काम झाले परंतु सदरहू काम अत्यंत नित्कृष्ठ दर्जाचे होते. सदर रस्त्यांना सिलकोट करण्यात आले नाही, साईड पट्टी करण्यात आली नाही, निविदेत नमुद केल्याप्रमाणे काम न झाल्याने सदरहू रस्ते हे 4 महिन्यांच्या आतच खराब झाले. रस्त्यांच्या कामाची व तालुक्यातील इतर रस्त्यांच्या कामाची चौकशी होऊन संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे पद्धतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यांत आला.

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष मनोज ढिकले, तालुकाध्यक्ष अमोल उगले, गोपीनाथ वाघ, रोशन जाधव, अभिजित राऊत, रोशन दिवटे, मिथुन वाघ, शेखर सांगळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com