
दिंंडोरी। प्रतिनिधी Dindori
दिंडोरी तालुक्यातील ( Dindori Taluka ) पिंपळणारे येथील ग्रामपंचायतीच्या ( Pimpalnare Grampanchayat )ग्रामनिधीतून काम न करता परस्पर रक्कम तीन लाख अठ्ठावीस हजार नऊशे चौदा रुपये ग्रामसेवक व प्रशासक यांनी संगनमताने अपहार केल्याची तक्रार ग्रामस्थांनी नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत पिंपळनारे ता. दिडोरी येशील कार्यरत ग्रामसेवक व प्रशासक यांनी ग्रामनिधीच्या फंडातून धामोडे वस्ती ते साळवे वस्ती रस्ता दुरुस्ती करणे कामाच्या नावाखाली काम न करता परस्पर रक्कम तीन लाख अठ्ठावीस हजार नऊशे चौदा रु. मात्र ठेकेदाराला हाताशी धरून काढून घेतलेले आहे.
यावेळी निवेदनासोबत सदरच्या रस्त्याचे ॠ.झ.ड. (अक्षांश रेखांश) छायाचित्र अर्जासोबत जोडलेले आहे. मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी तात्काळ समक्ष स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा केल्यास त्या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचे काम केलेले नाही हे आपल्या निदर्शनास येईल. तरी तक्रारी अर्जावरुन समक्ष पाहणी करत दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
संबंधित ठेकेदाराला वष; अखेर सदर न केलेल्या कामाचे बील अदा केले असल्याचे निर्दशास येत असून ही बाब नक्कीच गंभीर आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी होवून संबंधितावर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. तरी सदर प्रकरणाची सखोेल चौकशी करुन दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर विजय खांदवे, विष्णू खांदवे, देवीदास पिंगळे, प्रकाश धामोडे, प्रभाकर रामचंद्र खांदवे, धनंजय धामोडे, रामनाथ खांदवे, अनिल खांदवे, हरीचंद्र धामोडे, भगवान साळवे, सुरेश धामोडे, अजित खांदवे आदींसह ग्रामस्थांच्या सह्या आहे.