१७ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार

१७ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरातील पंचवटी कॉलेजमध्ये शिक्षण घेणार्‍या एका सतरा वर्षीय मुलाचे अपहरण ( kidnapped)झाल्याची तक्रार मसरूळ पोलीस ठाण्यात( Mhasrul Police Station) त्याचे वडिलांनी केली आहे. याबाबत अज्ञात आरोपी विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साहील रविकांत गामणे (वय 17 वर्षे 3 महिने, रा. गंगासागर रो हाउस नं07, शांती नगर, नेवा हॉस्पीटलचे पाठीमागे, मिलींद किराणासमोर, मखमलाबाद, नाशिक) असे अपहत मुलाचे नाव आहे. तो दि. 10 जानेवारी रोजी सकाळी 8:40 च्या दरम्यान राहत्या घराजवळुन कोणीतरी आमिष दाखवुन फुस लावुन पळवून नेल्याची तक्रार वडील रविकांत गणपत गामणे यांनी दिली आहे.

साहिलचे वर्णन रंगाने गोरा, उंची अंदाजे 5 फुट 6 ईंच, नाक बसके, चेहरा गोल, केस काळे (कुरळे), डोळे काळे, अंगात सफेद रंगाचा शर्ट व काळी पॅन्ट, पायात काळया रंगाचा शुज, त्याला मराठी, हिंदी, इंग्रजी, लिहिता बोलता येते. सोबत कॉलेजची बॅग, मोबाईल घेवुन सकाळी घरातून निघालेला साहील हा कॉलेजला गेला, घरातील कपाटातील नऊ हजार रुपये तो सोबत घेवुन गेला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com