ग्रामपंचायतीच्या ठरावात फेरफार केल्याची तक्रार

ग्रामपंचायतीच्या ठरावात फेरफार केल्याची तक्रार

ताहाराबाद । वार्ताहर Taharabad

येथील ग्रामपंचायतीच्या Taharabad Grampanchayat मासिक सभेच्या प्रोसिडिंग बुकमधील पाने बदलून मासिक सभेतील ठराव बदलल्याने chang in Monthly meeting resolution तत्कालीन ग्रामसेवकासह Gramsevak दोषींवर कारवाई करण्याची मागणी सत्ताधारी गटाने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडे केली आहे.

गत तीन महिन्यापासून चौकशीचे ग्रहण लागलेल्या ताहाराबाद ग्रुप पंचायतीचे प्रोसिडिंग बुक गेल्या आठवड्यात तत्कालीन ग्रामसेवक स्वप्नील ठोके यांनी बदली झाल्यानंतर तब्बल अडीच महिन्यानंतर विद्यमान ग्रामसेवक के.एस. पवार यांच्याकडे जमा केले आहे. प्रोसिडिंग बुकमध्ये पाने बदलून ठराव बदलल्याचे निदर्शनास आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

दि. 31 मेरोजी झालेल्या मासिक सभेत विरोधी सदस्य गटाशी संगनमत करत तत्कालीन ग्रामसेवक स्वप्नील ठोके यांनी ठराव क्रमांक पाच बदलून त्या ठिकाणी 15 व्या वित्त आयोग खर्चाबाबत ठराव टाकला आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाच्या सदस्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झालेला दिसून येत आहे.

मात्र, असा कुठलाही ठराव या बैठकीत झालाच नव्हता. ठरावासाठी सत्ताधारी व विरोधी गटातील कुठल्याही सदस्याने संपूर्ण सभेत गदारोळ केलेला नसून, ग्रामसेवक स्वप्नील ठोके यांनी सरपंचांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून केलेल्या भ्रष्टाचाराच्या बचावापोटी विरोधकांना हाताशी धरून प्रोसिडिंग बुकमधील ठरावात फेरफार केली आहे. याबाबत ठोस पुरावे मिळून आल्याचा दावा सत्ताधारी गटाने केला आहे.

दि. 31 मे 2021 च्या मासिक बैठकीच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून सत्यता पडताळणी करावी, अशी मागणी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, गटविकास अधिकारी पी.एस. कोल्हे यांची समक्ष भेट घेऊन केली असता याबाबत चौकशी करून दोषीवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, प्रोसिडींग बुकच्या पान क्रमांक 1 ते 19 वरील ठराव बरोबर असून पुढील सर्व ठरावात खाडाखोड केलेली दिसून येत आहे. हे ठराव लिहितांना पेन व शाईचा बदल तसेच 31 मेच्या सभेतील विषय क्रमांक 5, 6, 7 मध्ये खाडाखोड केलेली आहे.

शेवटच्या पानावर देण्यात आलेल्या दाखल्यात सरपंचांची स्वाक्षरी घेण्यात आलेली नाही. दाखल्यावरील पान क्रमांकात खाडाखोड केलेली आहे. प्रोसिडींग बुकमध्ये झालेल्या चुका जाणूनबुजून केल्याचे दिसून येत असल्याचा प्रथमदर्शनी अहवाल गटविकास अधिकारी पी.एस. कोल्हे यांनी दिला असून, सदर प्रकार अतिशय गंभीर असल्याने चौकशीसाठी सहाय्यक गटविकास अधिकारी हेमंतकुमार काथेपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी आर.एम. सूर्यवंशी, नितीन देशमुख, पाटील यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीची एका बाजूला चौकशी सुरू असतांना प्रोसिडींग बुकमध्ये फेरफार कोणत्या उद्देशाने करण्यात आला, याची सखोल चौकशी करून दोषीं ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी सत्ताधारी गटाच्या सरपंच शीतल नंदन, उपसरपंच जीवन माळी, सदस्य सीताराम साळवे, प्रीती कोठावदे, निखिल कासारे, राजेश माळी, जिजाबाई वनीस, ज्योती माळी, भारती सोनवणे यांनी केली आहे.

ताहाराबाद ग्रामपंचायतीत एकूण 17 सदस्य संख्या असून एका गटात 9 व दुसर्‍या गटात 8 सदस्य आहेत. त्यांचा सरपंच पदावरून आपापसात वाद-विवाद सुरु असून ते राजकिय स्वार्थासाठी आपण न केलेल्या आरोपांचे खापर आपल्यावर फोडून नाहक बदनामी करीत आहेत.

स्वप्निल ठोके, ग्रामविकास अधिकारी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com