आरोग्य केंद्रात शस्त्रक्रियेसाठी पैसे घेतल्याची तक्रार; समितीकडून चौकशी

आरोग्य केंद्रात शस्त्रक्रियेसाठी पैसे घेतल्याची तक्रार;  समितीकडून चौकशी

अंबासन | प्रशांत भामरे Ambasan

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात Ambasan Primary Health Center कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी family planning surgery रूग्णाकडून पैसे उकळल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा आरोग्य विभागाकडून चौकशी समिती गठीत करून नुकतीच भेट देऊन प्रत्येक कर्मचा-याची दिवसभरात कसून चौकशी केली. चौकशी अहवाल तयार करून वरीष्ठ जिल्हा आरोग्य विभागाकडे सादर केला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य आधिकारी डाॅ. युवराज देवरे Dr. Yuvraj Devre यांनी दिली.

अंबासन (ता.बागलाण) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटूब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पैसे घेतल्याची चिंचवा येथील योगिता सतिश जाधव यांच्या पतीने ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी अर्ज केला होता.

ग्रामपंचायत सरपंच राजसबाई गरूड, उपसरपंच स्वाती आहिरे, सदस्य शशीकांत कोर, भीमाबाई भामरे, मंगलबाई कोर, विजय गरूड, भाऊसाहेब भामरे आदिंनी दखल घेऊन प्रकरणाची शहानिशा करून थेट जिल्हा आरोग्य आधिकारी कपिल आहेर तसेच मुख्याधिकारी लिना बनसोड यांच्याकडे झालेल्या घटनेची चौकशी करून कारवाई करण्यासाठी निवेदन दिली.

त्या अनुशंगाने बुधवार (ता.१२) सकाळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य आधिकारी युवराज देवरे, मिलिंद सिध्देवार, तालुका वैद्यकीय आधिकारी हर्षलकुमार महाजन यांच्या गठीत समितीने प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट दिली.

प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी संपूर्ण कर्मचारी, आरोग्य सेवक, वैद्यकीय आधिकरी उपस्थित झाले होते. यावेळी प्रत्येक कर्मचाऱ्याची कसून चौकशी . डाॅ. देवरे यांनी केली. तसेच सदर अहवाल वरिष्ठांकडे सादर करून पुढिल कारवाई केली जाईल असे आश्वासन उपस्थित ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांना दिले.

असे बरेच रूग्ण आहेत की, ज्यांच्याकडुन कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पैसे घेतल्याचे बोलले जात आहे. यामुळे जो दोषी असेल त्यांना पाठिशी घालू नये अशी विनवणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.

...रूग्णाकडून पैसे उकाळणा-या संबधितांवर आरोग्य विभागाकडून पाठराखण न करता निष्ठेने चौकशी करून कारवाई करण्यात यावी तसेच चोर सोडून संन्यासाला फाशी देऊ नये तसे घडल्यास ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थ शांत बसणार नाहीत असे सांगण्यात आले. सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रास जोपर्यंत न्याय मिळत नाही तोवर कुलूप ठोकण्यात येईल याची गंभीर दखल घ्यावी असा इशाराच ग्रामपंचायतीने दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com