जि. प. प्रशासना विरोधात डॉ. कुंभार्डे यांची तक्रार

जि. प. प्रशासना विरोधात डॉ. कुंभार्डे यांची तक्रार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या Zilla Parishad Nashik आरोग्य विभागातील Department of Health औषध निर्माण अधिकारी विजय देवरे यांची प्रतिनियुक्ती रद्द करावी व फैय्याज खान यांची बदली करावी असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत झाला. मात्र, बैठक होऊन 15 दिवसांचा कालावधी उलटून देखील प्रशासनाने काहीच कार्यवाही केलेली नाही. यामुळे भाजप गटनेते डॉ.आत्माराम कुंभार्डे यांनी थेट विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे Divisional Commissioner Radhakrishna Game यांच्याकडे प्रशासनाविरोधात तक्रार केली आहे.या दोन सेवकांच्या मोबाईल कॉलचे अहवाल (सीडीआर) मागवून त्याची तपासणी करण्याची मागणी विभागीय आयुक्त गमे यांना देण्यात आलेल्या पत्रात केली आहे.

जि. प. आरोग्य विभागातील कार्यरत औषध निर्माण अधिकारी विजय देवरे हे औषध निर्माण अधिकारी अकरा वर्षापासून प्रतिनियुक्तीवर मुख्यालयात काम करीत आहेत. तसेच फैय्याज खान हेही अनेक वर्षांपासून मुख्यालयात ठाण मांडून आहेत. या दोन्ही अधिकार्‍यांचे हितसंबंध तयार झाल्यामुळे त्यांचे अनेक औषध कंपन्यांशी लागेबांधे तयार झाल्याचा आरोप डॉ. कुंभार्डे यांनी पत्रात केला आहे. पेसा क्षेत्रात बदली असूनही त्यांना प्रतिनियुक्तीने दहा-बारा वर्षे मुख्यालयात नियुक्ती देणे बेकायदेशीर असून जिल्हा परिषद प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

या दोन अधिकार्‍यांनी गतवर्षी करोना काळात औषध खरेदीसाठी आलेले एक कोटी रुपये सहा महिने अखर्चित ठेवून महामारीच्या काळात रुग्णांना औषधापासून वंचित ठेवले. जिल्हा परिषदेला जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त झालेल्या सात कोटींपैकी दोन कोटी रुपये अखर्चित ठेवल्याने तो निधी शासनाकडे पुन्हा जमा झाला. आरोग्य विभागातील औषध खरेदीची नोंद दिसून येत नाही. तसेच खरेदी व वितरणाचा ताळमेळ लागत नसल्याने अनेक वेळा मागणी करूनही माहिती उपलब्ध करून दिली जात नाही.

आरोग्य विभागाची नस्ती एकाच दिवसांत सर्व विभागांची मान्यता घेऊन मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचीही मान्यता घेतली जाते. याबाबत अनेकदा सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभेत चर्चा होऊनही प्रशासन या दोघांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप पत्रात करण्यात आलेला आहे. देवरे यांची प्रतिनियुक्त रद्द करण्याचा ठरावच स्थायीत झाला. मात्र, तत्पर प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याची तक्रार पत्रात करण्यात आली आहे.

स्थायी समितीत झालेल्या ठरावांची अंमलबजावणी होत नसल्याने विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. आरोग्य विभागातीलच एका कर्मचार्‍याची तक्रारींवर दहा मिनिटांत बदली केली जाते. मात्र, स्थायीत ठराव होऊन कर्मचार्‍यांची बदली करण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे. विभागीय आयुक्तांकडे दाद न मिळाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली जाईल.

डॉ. आत्माराम कुंभार्डे , भाजप, गटनेते जि. प.

Dr. Atmaram Kumbharde, BJP, Group Leader ZP

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com