नाशिक बाजार समितीविरोधात 'ईडी'कडे तक्रार

नाशिक बाजार समितीविरोधात 'ईडी'कडे तक्रार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये APMC Nashik करोडोचा भ्रष्टाचार व गैरव्यवहार Corruption and malpractice झाल्याचा आरोप करत भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील Corporator Dinkar Patil आणि भाजप शहर सरचिटणीस सुनील केदार Sunil Kedar- BJP यांनी थेट ‘ईडी’ ED कडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, अशाप्रकारचे आरोप हे बिनबुडाचे असून नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने असे आरोप होत असल्याचे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे Devidas Pingale, Chairman, Nashik APMC यांनी सांगितले.

या तक्रार अर्जात म्हटले आहे की, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील 20 वर्षांपासून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाला आहे. एका वर्षाच्या सरकारी लेखापरीक्षण अहवालात 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार, अफरातफरी, घोटाळा झाला असून जर एका वर्षात 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार तर 20 वर्षांत हा आकडा निश्चितच हजारो कोटींच्या घरात जाईल, असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

ही बाब गंभीरपणे घेऊन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी व ज्यांच्यामुळे शासनाचे, शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या पत्रासोबत महाराष्ट्र शासनाचा सरकारी लेखापरीक्षण अहवालही जोडण्यात आल्याचे म्हटले आहे. अर्जावर दिनकर पाटील आणि सुनील केदार यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

अभ्यास करणेदेखील गरजेचे

नुकत्याच पार पडलेल्या सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्था निवडणुकीत दिनकर पाटील यांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याने ते बेचैन झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी तज्ज्ञ संचालकपदाचीही निवड करण्यात आली. त्यावेळी दिनकर पाटील यांनी माझ्यासह सभापती व अन्य संचालकांना शिवीगाळ केली.

या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रारही देण्यात आली होती. तसेच संचालक मंडळांने शिस्तभंगाची कारवाई करत त्यांचे संचालकपददेखील रद्दबातल ठराव केला आहे. वर्षाकाठी बाजार समितीचे 16 कोटी उत्पन्न आहे, त्यात सर्वसाधारण सेवकांना दिला जाणारा पगार व स्वच्छता आदीसाठी एकूण 13 कोटी रुपये खर्च होतो.

वर्षाकाठी 3 कोटी रुपये शिल्लक राहतात तर 500 कोटींचा भ्रष्टाचार कसा होऊ शकतो? याचा अभ्यास करणेदेखील गरजेचे आहे. त्यामुळेच ते करत असलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. प्रत्येक ठिकाणी दादागिरी चालत नाही, हेही त्यांनी समजून घेणे गरजेचे आहे.

देवीदास पिंगळे, सभापती, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती Devidas Pingale, Chairman, Nashik APMC

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com