जुने नाशिक । Old Nashik (प्रतिनिधी)

शैलेंद्र नरसिग आनंद सरस्वती नावाच्या व्यक्तीने मुस्लिम समाजाचे आदरणीय पैगंबर साहेब तसेच इस्लाम धर्माविषयी अतिशय गलिच्छ भाषा दिल्ली येथे घेण्यात आलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये वापरली.

यामुळे समाजाची भावना दुखावली असून रजा व नुरी अकॅडमीच्या वतीने भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

मुंबईत ज्येष्ठ धर्मगुरू मोईन मियाँ अशरफी यांनी देखील तक्रार केली असून नाशिकमध्येही तक्रार देण्यात आली. यावेळी रजाचे जिल्हाध्यक्ष एजाज रजा, नुरीचे हाजी वसीम पिरजादा, मुख्तार शेख, मौलाना शरीफ अशरफी आदी उपस्थित होते.

वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे यांच्याशी चर्चा करुन समाजाच्या भावना व्यक्त करण्यात आले.