देवळालीगाव गोळीबार प्रकरणी माजी नगरसेवकाविरुद्ध तक्रार

देवळालीगाव गोळीबार प्रकरणी माजी नगरसेवकाविरुद्ध तक्रार

नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashik Road

गुरुवारी (दि.१९) रोजी रात्री देवळाली गाव (Deolali village) येथे शिवजन्मोत्सव समितीच्या बैठकीप्रसंगी शिंदे गट व ठाकरे गट (Shinde Group and Thackeray Group) यांच्यात शिवीगाळ धक्काबुक्की व त्यानंतर हवेत गोळीबार (Firing)करण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर सदरचे प्रकरण अद्यापही शांत झालेले नाही.

तसेच या घटनेप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांचे पुत्र स्वप्निल लवटे यास अटक (Arrested) करण्यात आली आहे. तर या प्रकरणाला आता नवीन कलाटणी मिळाली असून माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भैय्या मणियार व त्यांच्या दोन सहकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

या संदर्भात सूर्यकांत लवटे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गुरुवारी सायंकाळी शिवजन्मोत्सव समितीची बैठक चालू असतांना भैय्या मणियार, प्रशांत जाधव, सागर कोकणे व त्यांचे ८० ते १०० कार्यकर्ते आले व शिवजन्मोत्सव समितीच्या हिशोब मागण्याच्या कारणावरून हातात कोयते व तलवार लाट्या-काठ्या घेऊन आपणास शिवीगाळ करून दमदाटी केली. तसेच गर्दीत कुणीतरी अज्ञात आरोपीने पिस्तुलमधून फायर केली असे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, याप्रकरणी लवटे यांच्या तक्रारीनुसार उपनगर पोलीस ठाण्यात मणियार, प्रशांत जाधव, सागर कोकणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर (Nilesh Mainkar) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com