कृऊबा मतदार यादी संकलन

कृऊबा मतदार यादी संकलन

विंचूर। वार्ताहर | Vinchur

तालुक्यातील लासलगाव (Lasalgaon) व पिंपळगाव बाजार समिती (Pimpalgaon Market Committee) निवडणुकीसाठी (election) सहकार विभागाने मतदार यादी (Electoral Roll) संकलनाचे काम सुरू केले असून तशा सूचना तालुक्यातील सहकारी संस्था व ग्रा.पं. ला दिल्या आहेत.

ज्या बाजार समित्यांची मुदत संपली आहे किंवा 31 डिसेंबरला संपणार आहे अशा बाजार समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदार याद्यांचे (voter lists) काम करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना सहाय्यक निबंधक कार्यालयाने दिल्या आहेत.

त्यामुळे सहकारी संस्थांनी तातडीने आपापल्या व्यवस्थापकीय मंडळाची यादी व त्यासोबत ते व्यावस्थापकीय मंडळ निवडून आल्याचे निकालपत्र, रिक्त असलेल्या संचालकांच्या ठिकाणी स्वीकृतीने ती जागा भरली असल्यास त्यासंबंधीच्या ठरावाची प्रत सोबत जोडणे अनिवार्य आहे.

सहकारी संस्थांची यादीसाठी 1 सप्टेंबर अर्हता तारीख धरण्याचेही पत्रात सूचित केले आहे. निफाड तालुक्यातील (niphad taluka) सर्व पात्र सहकारी संस्थांनी आपापल्या व्यवस्थापकीय मंडळाची यादी वेळेत संबंधित अधिकार्‍याकडे देवून निवडणूक (election) कामास प्राधान्य द्यावे असेही कळविले आहे. त्यामुळे कऊबाची निवडणूक होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com