आरोग्य विद्यापीठाची विभागीय कार्यालये सक्षम
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे (Maharashtra University of Health Sciences) मुंबई (mumbai), पुणे (pune), औरंगाबाद (Aurangabad), नागपूर (Nagpur), लातूर (Latur) व कोल्हापूर (Kolhapur) येथील विभागीय कार्यालय प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजासाठी अधिक सक्षम होणार आहेत. यासाठी विद्यापीठाचे विभागीय कार्यालय जवळच्या संलग्नित महाविद्यालयांशी जोडण्यात आली आहेत.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण (The registrar of the university, Dr. Kalidas Chavan) यांनी सांगितले की, आरोग्य शिक्षणाच्या (Health education) विविध विद्याशाखांचे राज्यातील सुमारे 410 पेक्षा अधिक महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्नित आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, लातूर व कोल्हापूर येथे विद्यापीठाची विभागीय कार्यालय कार्यान्वित आहेत. विविध प्रशासकीय, शैक्षणिक व परीक्षाविषयक कामकाजासाठी विभागीय कार्यालये सक्षम करण्यात आली आहेत.
विद्यार्थी (students), शिक्षक (teachers), पालक व अभ्यांगतांना प्रशासकीय कामकाज करतांना अंतर सोईचे व्हावे तसेच विद्यार्थ्यांना दैनंदिन सामन्य कामाकरीता नाशिक मुख्यालयात येण्याची गरज पडू नये याकरीता विभागीय कार्यालये अधिक सक्षम करण्यात आली आहेत. याव्दारा सर्वांचा वेळ, पैसा आणि श्रम याची बचत होईल, असा विद्यापीठाचा मानस आहे. ते पुढे म्हणाले की, विद्यापीठाचे परिपत्रक क्र. 01/2022 मध्ये स्थानिक महाविद्यालय कोणत्या विभागीय केंद्राशी जोडण्यात आली आहेत.