ऊसाची भरपाई द्या; अन्यथा आत्मदहन

शेतकर्‍यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
ऊसाची भरपाई द्या; अन्यथा आत्मदहन

निफाड। प्रतिनिधी | Niphad

साखर कारखान्यांचा (Sugar factories) गाळप हंगाम संपत आला असतांनाही नांदूरमध्यमेश्वर (Nandurmadhyameshwar) शिवारात तोडणीअभावी 55 एकर ऊस (Cane) शिल्लक असून या ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी (farmers) आर्थिक संकटात सापडला आहे.

त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या ऊसाचे पंचनामे (panchanama) करून नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर आत्मदहन (Self-immolation) करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन (memorandum) नांदूरमध्यमेश्वर येथील ऊस उत्पादक शेतकर्‍यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana) पदाधिकार्‍यांनी तहसीलदार शरद घोरपडे (Tehsildar Sharad Ghorpade) यांना दिले आहे. नांदूरमध्यमेश्वर येथील ऊस उत्पादक शेतकर्‍यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नांदूरमध्यमेश्वर येथे ऊसतोड न मिळाल्यामुळे अंदाजे 55 एकर ऊस तोडणीअभावी शिल्लक राहिला असून

साखर कारखान्यांना (Sugar factories) अनेकवेळा विनंती करून देखील अद्यापपर्यंत ऊसतोड मिळालेली नाही. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आम्ही शेतकर्‍यांनी संगमनेर (Sangamner) येथील अमृत वाहिनी साखर कारखाना व्यवस्थापनाकडे अनेकवेळा मागणी करून देखील शेतकर्‍यांना ऊसतोडीचे सहकार्य केले नाही. ऊसतोडणी न केल्यास होणार्‍या नुकसानीची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहिल.

त्यामुळे शासनाने वेळीच आमच्या उभ्या ऊसाचा पंचनामा करुन तत्काळ 50 टक्के नुकसान भरपाई (Compensation) मिळवून द्यावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, भाऊसाहेब तासकर यांचेसह नांदूरमध्यमेश्वर येथील सचिन विठ्ठल शिंदे, दशरथ तुकाराम शिंदे, अजय नाना पगारे, गणपत फकिरा पगारे, जनार्दन गोविंद पगारे, बाळू नभाजी पगारे, युवराज नभाजी पगारे,

राजेंद्र केरू पगारे, ज्ञानेश्वर सुदाम पगारे, सुरेश बाबूराव बोढारे, दत्तू काशिनाथ गावडे, ताराबाई गोपीनाथ ठाकरे, शरद जगन्नाथ पगारे, सोपान मगन पगारे, लहानू पागाजी भडांगे, ज्ञानेश्वर अण्णा डांगले, आनंंदा फकिरा पगारे, संदिप वेडू पगारे, त्रंबक मल्हारी सोनवणे, एकनाथ माधव नाईकवाडे, दत्तू शंकर पगारे, कारभारी यशवंत पगारे, पुंडलिक रघुनाथ आढाव, सागर नंदू कदम आदींसह ऊस उत्पादक शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटना पदाधिकार्‍यांच्या सह्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com