इदगाह मैदानावर होणार सामुदायिक नमाज पठण

मनपा तर्फे तयारी सुरू
इदगाह मैदानावर होणार सामुदायिक नमाज पठण

जुने नाशिक । प्रतिनिधी Old Nashik

पवित्र रमजान महिन्याचे ( Ramjan Month ) 21 रोजे पूर्ण झाले असून येत्या 3 मे रोजी पवित्र रमजान ईदचा मोठा सण ( Ramjan Eid Festival ) मुस्लिम बांधव साजरी करणार आहे. करोना लॉकडाउनच्या काळात दोन वर्षानंतर यंदा ऐतिहासिक शहाजानी ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण होणार असल्यामुळे या ठिकाणी महापालिकेच्या वतीने तयारी सुरू झाली आहे.

याबाबतची मागणी सेना नेते माजी नगरसेवक मुशीर सय्यद तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका समीना मेमन यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. महापालिकेच्यावतीने या मैदानावर खड्डे बुजविण्याचे कामाला सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी भाविकांना हातपाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे तसेच माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी यंदा मंडप टाकण्याची मागणीदेखील केली आहे.

दरम्यान मुस्लिम बांधवांनी ईदची तयारीला प्रारंभ केला असून दोन वर्षानंतर शहाजानी इदगाह मैदानावर खतीब ए नाशिक हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली ईदची सामुदायिक नमाज पठण होणार असल्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान दिवसाला अत्यंत कडक ऊन राहत असल्यामुळे सायंकाळच्या सुमारास रोजा सोडल्यानंतर मुस्लिम बांधव बाजारात गर्दी करीत आहे.

यामुळे भद्रकाली परिसर, मेनरोड, शालिमार, शिवाजी रोड आदी भागात मुस्लिम बांधवांच्या गर्दीने फुलून निघत आहे. यंदा महागाई प्रचंड वाढल्यामुळे गोरगरीब तसेच मध्यमवर्गीयांचे बजेट कोलमडले आहे. तरीही बाजारामध्ये उत्साह दिसून येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com