योजनांची माहिती तळागाळात पोहोचवा; पालकमंत्री दादा भुसेंचे निर्देश

योजनांची माहिती तळागाळात पोहोचवा; पालकमंत्री दादा भुसेंचे निर्देश

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

जनकल्याणासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे विविध योजना राबविल्या जात आहे. या योजनांच्या लाभापासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व विभागांच्या अधिकारी-सेवकांनी घेतली पाहिजे.

या योजनांच्या यशस्वीतेसाठी त्यांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहचावी या दृष्टिकोनातून ग्रामसेवक, तलाठी, आशासेविका आदींची मदत घेतली जावी. या दृष्टिकोनातून सर्व विभागांनी समन्वय साधत करावे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांनी येथे बोलतांना दिले. येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांची तालुकास्तरीय आढावा बैठक (Review meeting) घेण्यात आली.

केंद्र व राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या पूर्तता व अंमलबजावणीचा आढावा या बैठकीत घेत भुसे यांनी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश अधिकार्‍यांना अप्पर जिल्हाधिकारी सी.एम. देशमुख (Upper Collector C.M. Deshmukh), प्रांत विजयानंद शर्मा (Province Vijayanand Sharma), कृषी अधिकारी दिलीप देवरे (Agriculture Officer Dilip Deore), प्रभारी तहसीलदार कैलास पवार, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. नीलेश सोनवणे, पशुधन विकास अधिकारी डॉ. मयुरा अर्बट, भुमी अभिलेख उपअधिक्षक राहुल पाटील, मनपा आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे, उपअभियंता सचिन माळवाळ, प्रभाग अधिकारी शाम बुरकूल आदी विभागांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

केंद्र व राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेस मिळण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत पालकमंत्री भुसे पुढे म्हणाले, आरोग्य विभागाच्या (Department of Health) योजना कोणत्या रुग्णालयात उपलब्ध आहेत. त्या रूग्णालयांची देखील यादी तयार करून जनतेस माहिती द्यावी. प्रधान मंत्री शहर व आवास योजनांमध्ये ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहेत परंतू त्यांची कामे प्रलंबित आहेत अशा लाभार्थींची देखील त्वरीत यादी तयार करावी, असे आदेश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना दिले.farmers

किसान क्रेडीट कार्डसाठी (Kisan Credit Card) जे शेतकरी (farmers) पात्र आहेत परंतु त्यांना अद्याप कार्ड देण्यात आलेले नसेल अशा शेतकर्‍यांना पंधरा दिवसाच्या आत कार्डचे वाटप जावे, अशी सूचना देत भुसे पुढे म्हणाले, या योजनेच्या लाभापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही या करिता शेतकर्‍यांची ईकेवायसी (E-KYC) करण्यात यावी. अटल पेन्शन योजना (Atal Pension Scheme), प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना (Pradhan Mantri Jeevanjyoti Bima Yojana), स्वामीत्व योजना, जलजीवन मिशन, स्वनिधी योजना आदी योजना प्रभावीपणे राबवून सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टिकोनातून अधिकार्‍यांनी काम केले पाहिजे.

शासनाच्या अनेक योजनांची माहिती मिळत नाही अशा तक्रारी आहेत. त्यामुळे योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीकोनातून ग्रामसेवक, तलाठी, आशासेविका आदींच्या मदतीने गावपातळीवर योजनांची माहिती देण्यात यावी या दृष्टिकोनातून सर्व विभागांनी समन्वय करीत नियोजन करावे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री भुसे यांनी शेवटी बोलतांना दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com