जुने नाशिक | Nashik

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी निर्णायक लढा उभारण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला आहे.

यासंदर्भात नाशिक जिल्हास्तरावर नुकतीच एक बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्ह्याची एक समन्वय समिती गठीत करून आगामी काळात आरक्षणासाठी लढा उभारण्याची तयारी व्यक्त करण्यात आली. मिरान पठाण यांच्यासह मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

रजानगर येथे झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे प्रतिनिधी सामील झाले होते.

आगामी काळात नाशिक शहर तसेच मालेगाव शहर यासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर समिती गठीत करून जिल्ह्याची एक प्रमुख समिती तयार करण्यात येणार आहे.

समाजाच्या भविष्यासाठी आरक्षण मिळणेही गरजेचे आहे. उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजाचे पाच टक्के आरक्षण कायम ठेवले होते, मात्र फडणवीस सरकारच्या वेळी ते रद्द करण्यात आले.

मात्र आता पुन्हा आघाडी सरकार आले आहेत, म्हणून सरकारने पाठपुरावा करीत मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण द्यावे, अशी एकमुखी मागणी करण्यात येत आहे.

नाशिकसह निफाड, मनमाड, देवळा, सटाणा, नांदगाव, मालेगांव, सिन्नर, चांदवड आदी ठिकाणचे लोक बैठकीत सामील झाले होते.