यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरु निवडीसाठी समिती गठीत

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरु निवडीसाठी समिती गठीत

मुंबई | Mambai

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) नव्या कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपाल (Governor) तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी निवड समिती गठीत केली आहे.

एनसीईआरटीचे माजी संचालक प्रा. जगमोहन सिंह राजपूत (Jagmohan Singh Rajput) यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड समिती गठीत करण्यात आली आहे. सुरत येथील सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे (Sardar Vallabhbhai National Institute of Technology) संचालक प्रा. अनुपम शुक्ला, उच्च व तंत्रशिक्षण (Higher and technical education) विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी तसेच भोपाळ येथील मध्य प्रदेश भोज मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. रवींद्र कान्हेरे (युजीसी प्रतिनिधी) हे या समितीचे अन्य सदस्य असतील.

दरम्यान, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई वायुनंदन यांचा कार्यकाळ दिनांक ७ मार्च  २०२२ रोजी सपंल्याने विद्यापीठाचे कुलगुरुपद रिक्त झाले होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे (Mahatma Phule Agricultural University) कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com