"टीडीआर' घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती गठित

भाजप नगरसेवक जगदीश पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
"टीडीआर' घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती गठित

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पंचवटी (panchavati) मधील बहुचर्चित टीडीआर घोटाळ्याच्या (TDR scams) चौकशीसाठी महापालिका आयुक्त कैलास जाधव (Municipal Commissioner Kailas Jadhav) यांनी अखेर चौकशी समिती गठित (Committee formed) केली आहे. भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) माजी गटनेते जगदीश पाटील (jagdish patil) यांच्या पाठपुराव्याला सुमारे दोन वर्षानंतर यश मिळाले आहे.

नाशिक (nashik) शहर पंचवटी भागातील प्रभाग क्रमांक ४ मधील सर्व्हे क्रमांक १५९ (पै.) या क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या जागेच्या संपादनात (space editing) झालेल्या टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीसाठी अतिरीक्त आयुक्त (शहर) सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त कैलास जाधव यांनी चौकशी समिती गठीत केली आहे. पंचवटीतील टीडीआर घोटाळ्याचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून गाजत आहे.

जगदीश पाटील यांनी हा घोटाळा उघडकीस आणला असून या प्रकरणातील दोषींवर कारवाईसाठी ते सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी महासभेने आदेश दिल्यानंतरही अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी केली गेल्याने पाटील यांनी महासभेवर थेट हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतरही बराच संघर्ष केल्यानंतर अखेर या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. अतिरीक्त आयुक्त (शहर) खाडे हे या चौकशी समितीचे अध्यक्ष आहेत.

नगरचना सहाय्यक संचालकपदाचा कार्यभार असलेले सी. बी. आहेर या समितीचे सदस्य सचिव तर मुख्य लेखा परिक्षक बोधिकिरण सोनकांबळे हे सदस्य आहेत. माजी सभागृहनेते सतीश सोनवणे, स्वत: माजी गटनेते पाटील व शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे हे या चौकशी समितीवर नामनिर्देशित सदस्य आहेत. चौकशी समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश अयुक्त जाधव यांनी दिले आहेत.

असे आहे प्रकरण

ज्या भूखंडावर टीडीआर घोटाळा झाला त्या भूखंडावर बांधीव शेड आणि अतिक्रमण (Encroachment) असतानाही भूसंपादनाची कारवाई केली गेली. त्यावरील अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकाम (Illegal construction) महापालिकेच्या खर्चाने हटवावे लागले. त्याची भरपाई सुद्धा महापालिकेने घेतलेली नाही. कमी क्षेत्राची खरेदी करून टीडीआर मात्र पूर्ण भूखंडावर देण्यात आला.

इतके करूनही या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर मालकसदरी महापालिकेचे नाव लागले नाही. यासंदर्भात पाटील यांनी आवाज उठविल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचा ठराव महासभेत करण्यात आला होता. मात्र, प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी हा ठराव दडवून ठेवला. त्यामुळे महासभेचा अवमान झाल्याने पाटील यांनी महासभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतरही अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाच्या चौकशीसाठी टोलवाटोलवी केली जात होती.

लवकर बैठक व्हावी टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीसाठी सतत केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आयुक्तांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे. या प्रकरणाची दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तसेच समितीचे कामकाज त्वरित सुरू होऊन बैठक घेण्यात यावी, आयुक्तांनी समिती गठीत केल्यामुळे त्यांचे आभार. यामुळे शहरातील इतर ही ठिकाणी झालेल्या टीडीआर घोटाळ्यांचे सत्य समोर येईल.

जगदीश पाटील, नगरसेवक, भाजप.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com