
नाशिक । Nashik
नाशिक महापालिकेची (Nashik Municipal Corporation) आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे उत्पन्नाचे नवनवीन स्त्रोत शोधण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. महापालिकेत सध्या प्रशासक राजवट सुरू असून नवीन आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार (Commissioner Ramesh Pawar) यांनी देखील काटकसरीचे धोरण अवलंबिले आहे.
या पार्श्वभूमीवर आता महापालिकेच्या सिटीलींक बसेसवर (City Link bus) देखील जाहिराती (Advertising) करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी (Chief Accounts and Finance Officer) नरेंद्र महाजन (Narendra Mahajan) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्तांनी विविध रखडलेल्या कामांना कात्री लाऊन तसेच नाहक खर्चावर प्रतिबंध करीत सुमारे दोनशे कोटी रुपयांची आतापर्यंत बचत केल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे शहरातील महापालिकेचे विद्युत खांब (Electric pole) यांच्यासह मनपाचे अधिकृत जाहिराती फलक मधून उत्पन्न मिळत आहे.
तर आता नाशिक महापालिकेच्या माध्यमातून सिटीलींक कंपनीच्या द्वारे शहरात बस सेवा सुरू आहे. त्या बसेसवर देखील जाहिरात फलक दिसणार आहे. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात भर पडेल तसेच बसचा तोटा देखील त्याच्यातून भरून निघण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यासाठी महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी स्वतंत्र समिती गठीत केली आहे. चार सदस्यीय समितीमध्ये अध्यक्ष वित्त अधिकारी (Finance Officer) असून त्यांच्या सोबतीला आणखी तीन अधिकारी देण्यात आले आहे. ही समिती सर्व प्रकारची माहिती गोळा करून तसेच जाहिराती कशा पद्धतीने व किती स्वरूपाच्या लावायचे, त्याच्यातून महापालिकेला किती उत्पन्न मिळेल, या सर्व बाबतची चर्चा करून त्याचा अहवाल आयुक्तांना देणार आहे. त्या अहवालावरून नाशिक महापालिकेच्या बसेसर (bus) जाहिराती लावण्यात येणार आहे.