शेतकर्‍यांना सुविधा पुरविण्यास समिती कटीबध्द : ठाकरे

डांगसौंदाणे उपबाजारात मका लिलाव
शेतकर्‍यांना सुविधा पुरविण्यास समिती कटीबध्द : ठाकरे

डांगसौंदाणे । नीलेश गौतम | Dangsaundane

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Satana Agricultural Produce Market Committee) डांगसौंदाणे उपबाजार समितीचा (Dangsaundane Sub Market Committee) शेतमाल खरेदी शुभारंभ

आज दसरा सणाच्या (Dussehra festival) शुभमुहूर्तावर बाजार समितीचे सभापती पंकज ठाकरे Chairman of Market Committee Pankaj Thackeray यांच्यासह संचालकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात केला गेला. शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी मक्याला 3 हजार 251 रूपये तर कांद्याला 2100 रूपये सर्वाधिक भाव मिळाल्याने शेतकर्‍यांमध्ये (farmers) आनंदाचे वातावरण दिसून आले.

गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेला डांगसौंदाणे (Dangsaundane) उपबाजार आज दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्यात आला. पहिल्याच दिवशी शेतकर्‍यांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत आपला शेतमाल या उपबाजार समितीच्या आवारात आणल्याने उपबाजार आवार शेतकर्‍यांच्या उपस्थितीने गजबजले होते. सटाणा (satana) येथील बहुसंख्य व्यापारी व स्थानिक व्यापारी यांनी उपबाजार समितीत नऊ ट्रॅक्टरमधून आलेला सुमारे 300 क्विंटल खरिपाचा मका (Maize) व 29 ट्रॅक्टर मधून आलेला 900 क्विंटल उन्हाळ कांदा (summer onion) या व्यापार्‍यांनी खरेदी केला.

खरीपाच्या मक्याला 3251 रुपये हा सर्वाधिक दर लौकिक ट्रेडिंग कंपनीचे संचालक पंकज बधान यांनी वनोली येथील शेतकर्‍यास दिला तर कांद्याला 2100 रुपये दर स्थानिक व्यापारी शिवा बैरागी यांनी दिला. मक्याला सरासरी सतराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल तर कांदा पंधराशे ते अठराशे रुपये दरम्यान या उपबाजारात खरेदी केला गेला.

डांगसौंदाणे उपबाजार समितीमुळे (Dangsaundane Sub Market Committee) परिसरातील शेतकर्‍यांची होणारी गैरसोय टळणार आहे. या बाजार समितीत शेतकर्‍यांच्या मालाला योग्य मोबदला देण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती पंकज ठाकरे (Chairman of Market Committee Pankaj Thackeray) यांनी यावेळी बोलतांना दिली. स्थानिक संचालक असलेले संजय सोनवणे यांनी वेळोवेळी या उपबाजार समितीसाठी संचालक मंडळाकडे पाठपुरावा केल्याने उपबाजार आज प्रत्यक्षात सुरू झाल्याचे सभापती ठाकरे यांनी शेवटी बोलतांना सांगितले.

यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने कृउबा संचालक मंडळ व पदाधिकारी व्यापारी, हमाल, मापारी यांचा सत्कार करण्यात आला. संचालक मंडळाने उपबाजार समिती सुरू केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने विद्यमान संचालक संजय सोनवणे यांनी आभार मानले तर उपबाजार समिती निर्मितीसाठी आलेल्या अडचणी आणि त्यातून खडतर असा मार्ग काढीत डांगसौंदाणे उपबाजार सुरू केल्याची माहिती संजय देवरे यांनी दिली.

या भागातील जास्तीतजास्त शेतकर्‍यांनी डांगसौंदाणे उप बाजार आवारात आपला शेतमाल विक्रीसाठी आणावा. भविष्यात बाहेरील आलेल्या व्यापार्‍यांनाही माल साठवणुकीसाठी गोदामाची व्यवस्था बाजार समितीने करून देण्याची विनंती संजय सोनवणे यांनी बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे यांना केली. यावेळी बाजार समितीचे उपसभापती मधुकर देवरे, संचालक प्रभाकर रौंदळ, सरदारसिंग जाधव, प्रकाश देवरे, रत्नमाला सूर्यवंशी, संजय बिरारी, तुकाराम देशमुख, सुनिता देवरे, ज्ञानेश्वर देवरे, केशव मांडवडे, श्रीधर कोठावदे, संदीप साळे,

जयप्रकाश सोनवणे, मंगला सोनवणे, वेणूबाई माळी, नरेंद्र अहिरे, सचिव भास्कर तांबे, उपसचिव विजय पवार, प्रकाश ह्याळीज, लेखापाल भगवान अलई, दत्तू साबळे, किरण पवार, डांगसौंदाणे सरपंच जिजाबाई पवार, उपसरपंच सुशीलकुमार सोनवणे, ग्रा.प. सदस्य वैशाली बधान, विजय सोनवणे, रामचंद्र पवार आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पंढरीनाथ बोरसे यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com