मुल्हेर तीर्थक्षेत्र विकासासाठी कटीबध्द

विश्वशांती उत्सव सोहळ्यात ना. झिरवाळ यांची ग्वाही
मुल्हेर तीर्थक्षेत्र विकासासाठी कटीबध्द

मुल्हेर । प्रतिनिधी Mulher

मुल्हेर किल्ल्याचे ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या अनन्य साधारण असे महत् आहे. जागृत तीर्थक्षेत्र असल्यामुळेच गुरुवर्य संत सुदामदास महाराज यांनी जंगलात राहून केलेले ध्यान व तपस्या महान आहेत. त्यामुळे मुल्हेर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्य विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ यांनी येथे बोलतांना दिली.

मुल्हेर, ता. बागलाण येथील किल्ल्यावर विश्वशांती करिता उत्तरायण उत्सव अ.भा. श्री पंच दिगंबर अनी आखाड्याचे उपाध्यक्ष रामकिशोरदास शास्त्री यांचे शिष्य संत सुदामदास महाराज यांना देशातील साधुसंतांच्या उपस्थितीत श्री. महंतपदी गादीवर विराजमान करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना ना. झिरवाळ बोलत होते.

प्रारंभी हभप विश्वनाथ महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. सहकार अधिकारी वसंत गवळी, निसर्गमित्र अरुणकुमार भामरे यांनी प्रास्ताविक केले. योगेश शास्त्री यांनी मंत्रपठण करून धार्मिक पूजन केले. यावेळी मान्यवर दाम्पत्यांच्या हस्ते किल्ल्यावर सुंदरकांड हवंन, लघुरुद्र, शिवमहिमा स्तोत्र पाठ, धार्मिक पूजण करण्यात आले.

मुल्हेर किल्ल्यावरील ऐतिहासिक जीर्ण मंदिरे, तटबंदी, बारव, पाण्याच्या टाकी आदींच्या दुरुस्तीसाठी तसेच किल्ला क्षेत्रातील वनसंपदा असलेले जंगल ही टिकून राहावे यासाठी मंत्रालयात लवकरच स्वतंत्र बैठक आयोजित करून येथील व परिसरातील विकासकामे करण्यात येईल असे आश्वासन ना. झिरवाळ यांनी यावेळी बोलतांना दिले.

यावेळी आ. मंजुळा गावित, मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, कृउबा सभापती संजय भामरे, संचालक कृष्णा भामरे, आबा बच्छाव यांनी मुल्हेर किल्ला तीर्थक्षेत्र विकासाबाबत मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास द्वारकाधीश साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत, उपसभापती राघो अहिरे, संचालक डॉ. प्रशांत देवरे, डॉ. विश्राम निकम, अशोक पवार, नगरसेवक दिनकर पाटील, जि.प. सदस्य यतीन पगार, के.पी. जाधव, साधना गवळी, रेखा पवार,

पो.नि. श्रीकृष्ण पारधी, रामकृष्ण अहिरे, बिंदू शर्मा, यशवंत पाटील, सोमनाथ वालझाडे, गोकुळ परदेशी, पवन तिवारी, भास्कर अहिरे, डी.बी. आहिरे, दर्शन खैरनार, विकास जाधव यांच्यासह महाराष्ट्र गुजरात व इतर राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com