कातकरी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध - डॉ. गावित

न्यूज अपडेट/News Update
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

नाशिक | Nashik

आदिम आदिवासी कातकरी समाजाच्या (Tribal Katkari Community) सर्वांगीण विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविणार असून सर्व संबंधित यंत्रणांनी त्याबाबतचा ठोस कृती आराखडा तयार करून सहा महिन्यात त्याची १०० टक्के अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्याचे निर्देश आदिवासी विकासमंत्री (Tribal Development Minister) डॉ. विजयकुमार गावित (Dr. Vijayakumar Gavit) यांनी दिले आहेत...

इगतपूरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) आदिम आदिवासी कातकारी समुदायाच्या बालकांकडून अहमदनगर जिल्ह्यात वेठबिगारी केली जात असल्याच्या प्रसारमाध्यमांमधील वृत्तांच्या अनुषंगाने आज नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बैठकीत डॉ. गावित बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी (Collector Gangatharan D) जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील (SP Sachin Patil) आदिवासी विकास अपर आयुक्त संदिप गोलाईत (Sandip Golait) नाशिकच्या आदिवासी विकास प्रकल्प जिल्हाधिकारी वर्षा मीना (Varsha Meena) कळवण आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विकास मीना Vikas Meena) इगतपूरीचे प्रांताधिकारी तेजस चव्हाण (Tejas Chavan) तहसिलदार अनिल दौंड (Anil Daund) व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. गावित म्हणाले, नाशिकसह प्रत्येक जिल्ह्यात आदिम व आदिवासी समुदायांच्या लोकांचे होणारे स्थलांतर, त्यांचे प्रश्न, समस्या, कौटुंबिक पार्श्वभुमी, त्यांच्यासाठी लागू असलेल्या योजना, मिळालेले लाभ, लाभापासून वंचित राहिल्याची कारणे, होणारे स्थलांतर त्याची कारणे यासाठीचे सर्वेक्षण प्रत्येक वाड्या-पाड्यात करण्यात यावे. त्यात आधार, बँक खाते, जात प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र यासारख्या बाबींचेही सर्वेक्षण करून जे बांधव त्यापासून वंचित राहिले आहेत त्या प्रत्येकाला ते मिळण्यासाठी महिनाभरात उपाययोजना कराव्यात, असेही डॉ. गावित यांनी सांगितले.

तसेच कातकरी समाजाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांचे स्थलांतर (migration) थांबवून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी ठोस पाऊले शासनामार्फत उचलली जाणार आहेत. नुकत्याच वेठबिगारीत आढळून आलेल्या बालकांना व त्यांच्या कुटुंबियांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकास ३० हजारांची मदत राज्य शासनामार्फत केली जाणार असून केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येकी २ लाख रूपये त्यांना मिळावेत यासाठीचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या आहेत.

इगतपुरी तालुक्यातील आदिम आदिवासी कातकरी समाजाचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबविण्याच्या दृष्टिने त्यांना सुमारे १ हजार ४०० घरकुले बांधण्याची योजना विचाराधीन असून तेथेच परिस्थितीनुरूप हक्काचा रोजगार त्यांना मिळवून देण्यासाठी शासकीय जमीन त्यांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून महसूल व वनविभागाने (Revenue and Forest Department) कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी गावित यांनी दिल्या आहेत.

तसेच नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर धरणे (Dam) असून या धरणांवर आदिवासी बांधवांच्या गटांमार्फत मत्स्यपालन करण्यासाठीची योजना स्थानिक पातळींवर राबविण्यासाठीचा प्रस्ताव तयार करावा असेही डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com