तालुका विकासासाठी कटिबद्ध : आ. कांदे

तालुका विकासासाठी कटिबद्ध : आ. कांदे

नांदगाव । प्रतिनिधी | Nandgaon

तालुक्यातील कळमदरी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सुसज्ज इमारतीसह (building) विविध विकासकामांचा लोकार्पण आ. सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांच्या हस्ते करण्यात आले. शहरासह तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी (development) आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी बोलतांना दिली.

तालुक्यातील कळमदरी (Kalamadari) येथे जनसुविधा योजनेंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय सुसज्ज इमारत बांधकाम पूर्ण झाले आहे. या इमारतीसह ग्रामपंचायत कार्यालय (Gram Panchayat Office) परिसरातील सभा मंडप, स्मशानभूमी वॉल कंपाऊंड (wall compound), गाव अंतर्गत स्ट्रिट लाइट (Street light) व दलित वस्ती अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण कामाचे (Durgarpan of historic cannons) लोकार्पण तसेच

ग्रामविकास कार्यक्रम 2020-21 अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन (bhumipujan) आ. सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आले. आदिवासी वस्तीवरील सभामंडप बांधणे, स्मशानभूमी अंतर्गत बैठक व्यवस्था शेडची निर्मिती करणे, ग्रामपंचायत कार्यालय परिसरात पेव्हर ब्लॉक (Paver block) बसवणे व सोलर सिस्टीम बसवणे ही विविध विकासकामे साकारली जाणार आहेत.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना आ. कांदे म्हणाले, नांदगाव-मनमाड (Nandgaon-Manmad) शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावात विकासकामे होण्याच्या दृष्टिकोनातून शासन पातळीवर विविध योजनांच्या माध्यमातून निधी (fund) उपलब्ध करून घेण्यासाठी आपण करीत असलेल्या पाठपुराव्यास यश येत असल्याने विकासकामे साकारली जात आहे.

तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) व पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांनी दिले आहे. त्यामुळे विकासकामांची ही घोडदौड आगामी काळात देखील सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास गटविकास अधिकारी गणेश चौधरी, बांधकाम विभागाचे उपअभियंता पाटील, विलास आहेर, सभापती सुभाष कुटे, रमेश बोरसे, प्रहार संघटनेचे शेखर पगार, प्रमोद भाबड, किरण देवरे, दिलीप पगार, प्रमोद चव्हाण, कळमदरी सरपंच मनोज पगार, उपसरपंच अंजनाबाई पगार, डॉ. विशाल पगार, सुरेश पगार, रमेश पगार, नितीन पगार, दिलीप पगार, सुनील सूर्यवंशी, प्रवीण सूर्यवंशी, शेखर शेवाळे, शशिकांत पगार आदिंसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com