विकासकामांच्या पूर्ततेसाठी कटिबद्ध- आ. सुहास कांदे

विकासकामांच्या पूर्ततेसाठी कटिबद्ध- आ. सुहास कांदे

मनमाड । प्रतिनिधी Manmad / Nandgaon

सर्वागीण विकासाच्या माध्यमातून मनमाड-नांदगाव शहराचाच नव्हे तर संपूर्ण नांदगाव ( Nandgaon) मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलण्याचा ध्यास आपण बाळगला आहे. विकासकामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही याची काळजी आपण घेत असल्याची ग्वाही नांदगावचे आ. सुहास कांदे ( MLA- Suhas Kande )यांनी येथे बोलतांना केले.

मतदारसंघातील मनमाडसह नांदगाव शहरातील प्रलंबित विकासकामांना चालना मिळावी यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे ( Urban Development Minister Eknath Shinde) यांच्याकडे आ.सुहास कांदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. यास अखेर यश येवून नांदगाव व मनमाडसाठी 20 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने विविध विकासकामे मार्गी लागणार आहे. मनमाड येथील विकासकामांचा शुभारंभ ( development works ) आ. कांदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

मनमाड शहरातील सर्वात मोठी समस्या पाण्याची आहे. गेल्या अनेक वर्षापासून नागरिक भीषण पाणीटंचाईला तोंड देत असून ही समस्या करंजवन योजनेच्या माध्यमातून सोडविल्या शिवाय राहणार नाही, असे आश्वासन आ. कांदे यांनी दिले. यावेळी पत्रकाराशी त्यांनी संवाद साधतांना शहराचा विकास आणि पाणी समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची ग्वाही दिली.

यावेळी आ. कांदे म्हणाले की, दीड वर्षांच्या करोना काळात मूलभूत स्वरूपाच्या नागरी समस्यांची सोडवणूक करताना निधी अभावी अनेक विकासाची कामे खोळंबली होती. शहराच्या विकासाच्या कामांना चालना देण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर नांदगाव व मनमाड या दोन्ही शहरासाठी 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून नांदगाव शहरात तर मनमाडला विकास कामांचा शुभारंभ केला जात आहे.

या निधीतून शहरात विविध प्रभागांतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासह भुयारी गटारी ( Underground sewer ) व इतर कामे केली जाणार आहे. करंजवन योजनेबाबत माहिती देतांना आ. कांदे म्हणाले कि या योजनेच्या शासकीय समितीत लोकप्रतिनिधी म्हणून माझी नियुक्ती झाल्यानंतर अधिकार्‍यांसोबत एक महत्वपूर्ण बैठक झाली .

त्यात सदर योजना लवकरात लवकर कशी मार्गी लागेल या विषयी सविस्तर चर्चा झाली आहे. आगामी काळात योजनेसंदर्भात नागरिकांना निश्चित शुभवार्ता मिळणार असल्याचे संकेत देत आ. कांदे पुढे म्हणाले, करंजवन योजनेची पूर्तता करत पाणीटंचाईचा ( water scarcity )प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचे आ. कांदे यांनी पुढे बोलतांना सांगितले.

शहराच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या 10 कोटीच्या निधीतून जी विकासकामे केली जाणार आहे त्याचा शुभारंभ बुरकुलवाडी या भागातून करण्यात आला. आ. कांदे यांनी भूमिपूजन फलकाचा अनावरण केल्यानंतर विकास कामांचा नारळ वाढवला . त्यानंतर शहरातील 1 ते 15 या प्रभागात विविध विकासकामांना सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी आ. राजाभाऊ देशमुख, ज्येेष्ठ शिवसैनिक अल्ताफ खान, रमेश हिरण, प्रभारी नगराध्यक्ष राजेंद्र आहिरे, गट नेते गणेश धात्रक, उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद, तालुका प्रमुख किरण देवरे, शहर प्रमुख मयूर बोरसे, नगरसेविका शेख, नगरसेवक छोटू पाटील, गंगाभाऊ त्रिभुवन यांच्यासह राजेंद्र भाबड, सुनील पाटील, सानाज्य कटारिया, गालिब शेख आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com