विकास कामे पूर्ण करण्यास कटीबध्द -आ. दिलीप बोरसे

विकास कामे पूर्ण करण्यास कटीबध्द -आ. दिलीप बोरसे

मुंजवाड । वार्ताहर Munjvad

विकासकामे ( devlopmnet works ) ही न थांबणारी व निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. अनेक आपत्तीचा सामना करत शासन स्तरावर पाठपुरावा करून विविध विकासांची कामे केली जात आहेत. करोनासारखे ( Corona ) संकट किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळातही विकासकामे सुरू ठेवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करीत असून तालुक्यात विकासकामे या पुढेही नियमित सुरू राहतील, अशी ग्वाही बागलाणचे आ. दिलीप बोरसे ( MLA Dilip Borse ) यांनी दिली.

बागलाण मतदार संघातील नामपूर जिल्हा परिषद गटातील सुमारे साडे तेरा कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमीपूजन आ. बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

जि.प. माजी सभापती यतीन पगार, जि.प. सदस्य कन्हू गायकवाड, पं.स. सभापती ज्योती अहिरे, शीतल कोर, कृउबा सभापती शांताराम निकम, संचालक भाऊसाहेब अहिरे, भाऊसाहेब कांदळकर, भाऊसाहेब कापडणीस, रुपेश शहा, सचिन हिरे, जिभाऊ कोर, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, उपअभियंता सुरेश देवरे, अशोक शिंदे, किरण ठाकरे, भैय्या दहिते, शेखर मोरे, सतीश पवार, पप्पू पवार, संजय पवार आदी उपस्थित होते.

करोनामुळे काही काळ थांबलेली विकासकामे आता पुन्हा सुरू झाली असून रखडलेली सर्व कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या विकास कामासाठी लागणारा आवश्यक निधी शासनस्तरावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे साल्हेर येथे स्मारक व शिवसृष्टी हा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याच्या कामाला आगामी काळात चालना देऊन त्याला गती देण्यात येणार असल्याचेही आ. बोरसे यांनी स्पष्ट केले.

बागलाण ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण होत असून करोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यावेळी प्रथमतः नागरिकांचे जीव वाचविण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी व सर्व नियमावलीचे पालन करून प्रत्येकाने आपले कुटुंब सुरक्षित राहील याची खबरदारी घ्यावी, असे आवाहनही आ. बोरसे यांनी शेवटी बोलतांना केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com