पोलीस वसाहतीमध्ये 'या' प्राण्यांचे साम्राज्य; आयुक्तांची पोलीस वसाहतीला भेट

पोलीस वसाहतीमध्ये 'या' प्राण्यांचे साम्राज्य; आयुक्तांची पोलीस वसाहतीला भेट

नाशिकरोड । प्रतिनिधी | Nashik Road

नाशिकरोड पोलीस स्टेशनच्या (Nashik Road Police Station) पाठीमागे असलेल्या पोलीस वसाहतीमध्ये (Police colonies) प्राण्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून

पोलीस कुटुंबीयांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत काहीतरी उपाययोजना करा, अशी मागणी पोलीस कुटुंबातील महिला सदस्यांनी पोलीस आयुक्तांकडे (Commissioner of Police) केली.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Commissioner of Police Ankush Shinde) यांनी नुकतीच नाशिकरोड पोलीस स्थानकाला (Nashik Road Police Station) भेट दिली. सुरुवातीला पोलीस आयुक्त शिंदे यांनी नाशिकरोड पोलीस स्टेशनच्या पाठीमागे असलेल्या पोलीस वसाहतीला भेट देऊन तेथील कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांशी बातचीत करून समस्या ऐकून घेतल्या. यावेळी काही महिलांनी आयुक्तांना येथील वसाहतीमधील समस्या सांगितल्या.

वसाहतीमध्ये साप, अजगर, नाग यासारखे विषारी प्राणी (poisonous animals) असून घरात लहान मुले व महिला असल्याने घराबाहेर निघणे मुश्किल होते. याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी महिलांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे केली. तसेच या वसाहतीमध्ये रात्रीच्या वेळी पथदीप बंद असतात. त्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरते. काही दिवसापूर्वी असलेली महसूल कर्मचार्‍यांचे घरे राज्य शासनाने पाडल्यामुळे संपूर्ण परिसरात गाजर गवत निर्माण झाले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरून त्या ठिकाणी सदरचे विषारी प्राणी वावरत असतात.

दरम्यान या ठिकाणची पाहणी केल्यानंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिकरोड पोलीस स्थानकात पोलीस कर्मचार्‍यांशी चर्चा केली व कामाचा आढावा घेतला. यावेळी वपोनि अनिल शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी पोनि गणेश नायदे, राजू पाचोरकर, सपोनि योगेश पाटील आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com