फुलवाल्या आजींच्या भेटीसाठी पोलीस आयुक्त थेट घरी

फुलवाल्या आजींच्या भेटीसाठी पोलीस आयुक्त थेट घरी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सातपूर कोळीवाडा Satpur - Koliwad येथे जिजाबाई पुराणे Jijabai Purane यांचे फुलांचे दुकान Flower's Shopआहे. पोलीस आयुक्त दीपक पांडे Police Commissioner Deepak Pandey हे नेहमी देवासाठी या आजीबाईंकडून फुले विकत घेतात. मात्र सध्या बाजारातून जात असताना जिजाबाई फुले विकतांना दुकानावर त्यांना दिसल्या नाही.

त्यांनी दुकानावर जाऊन जिजाबाईंची चौकशी केली. येथे त्यांच्या मुलाने सांगितले की, जिजाबाईना कॅन्सर झाला आहे. त्या सध्या घरीच असतात. हे ऐकताच क्षणाचा विलंब न करता आयुक्त दीपक पांडे यांनी जिजाबाईंचे घर गाठले. तेथे जिजाबाईंच्या तब्येतीची विचारपूस केली. जाताना फळे, शाल व औषधोपचासाठी पाच हजारांची मदत केली

सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांना सांगितले की, जिजाबाईं वेळोवळी विचारपूस करावी. दीड तास आजीसोबत विचारपूस केल्यानंतर जिजाबाई गहिवरून गेल्या आणि म्हणाल्या खाकीवर्दीतला देवमाणूस आज मी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या स्वरुपात बघितला. कारण इतका मोठा माणूस या गरिबाच्या झोपडीत मला बघायला आला अन् मी कॅन्सरग्रस्त असतानासुद्धा. खरंच माणुसकीचे दर्शन या रुपाने बघावयास मिळाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com