दिव्यांग कल्याण आयुक्तांची नॅबला भेट

दिव्यांग कल्याण आयुक्तांची नॅबला भेट

सातपूर । प्रतिनिधी Satpur

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड, युनिट महाराष्ट्र NAB, Maharashtra संचालित भावना चांडक फलोर महानॅब स्कूल या अंध मुलींची निवासी शाळा, कर्णबधिर-अंधत्व, बहुविकलांग मुला-मुलींची शाळा, स्पेशल बी.एड., डी.एड. महाविद्यालय या उपक्रमांना दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख Commissioner for Persons With Disabilities - Omprakash Deshmukh यांनी भेट देत माहीती घेतली.

अंध मुला-मुलींचे ऑनलाईन शिक्षण पद्धत, ब्रेल लिपी आणि सहाय्यक उपकरणांसह लेखन वाचन पद्धत, संगणक कक्ष, ब्रेल वाचनालय, मोबाईल अ‍ॅपद्वारे शिकवण्यात येणारी स्वलेखन पद्धत आणि बहुविकलांग मुला- मुलींचे शिक्षण यासंदर्भात विशेष शिक्षकांकडून माहिती घेताना आयुक्त भावनिक झाले. संस्थेचा अभिनव प्रकल्प सेन्सरी गार्डन व परिसरातील व राज्यातील विविध उपक्रमाबद्दल माहिती घेऊन संस्थेचे कामकाज गुणवत्तापूर्वक आहे असे गौरवोद्गार काढले.

संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, उपाध्यक्ष सुर्यभान साळुंखे, मानद महासचिव गोपी मयूर, सहसचिव मुक्तेश्वर मूनशेट्टीवार, मंगला कलंत्री यांचे समवेत संस्थेच्या कामकाजासंदर्भात चर्चा झाली व आयुक्तांनी प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी आयुक्तांसमवेत जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा उपायुक्त रवींद्र परदेशी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता विजय पाटील, सहाय्यक सल्लागार कैलास उईके, तसेच नॅब महाराष्ट्राचे संचालक विनोद जाधव, अधिकारी रत्नाकर गायकवाड, वाल्मिक पाटील, स्मिता सोनी, पूजा भालेराव व कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.