आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार स्पेन दौऱ्यावर

आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार स्पेन दौऱ्यावर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जागतिक स्तरावरील स्मार्ट सीटी एक्स्पोसाठी (Smart City Expo) महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Commissioner and Administrator Dr. Chandrakant Pulkundwar) आज पासून तीन दिवसांच्या स्पेन दौऱ्यावर (Spain Tour) रवाना झाले. पुढच्या सोमवारीच ते नाशिक महापालिकेत (Nashik Municipal Corporation) येणार आहे, असे समजते.

दरम्यान शासकीय दौऱ्यावर आयुक्त गेल्यामुळे प्रभारी आयुक्त पदाची जबाबदारी कोणाला अधिकृत दिली नसली तरी तातडीच्या कामांची जबाबदारी महापालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त अर्चना तांबे (In-charge Additional Commissioner Archana Tambe) यांच्याकडे आहे. जगभरातील स्मार्ट सिटीचे (Smart City) प्रतिनिधी बार्सिलोना (Barcelona) येथे एक्स्पोसाठी एकत्र येणार असून स्मार्ट सीटी कशी असावी या विषयावर दि.१५,१६,१७ असे तीन दिवस चर्चा सत्र होणार आहे.

महाराष्ट्रातून (maharashtra) ठाणे (thane), कल्याण (kalyan), डोंबिवली (Dombivli), नागपूर (nagpur) या स्मार्ट सीटीचे प्रतिनिधी देखील या एक्स्पो मध्ये सहभागी होणार आहेत. या एक्स्पोसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें (Chief Minister Eknath Shinde) यांच्यासह नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव सोनिया सेठी या देखील उपस्थित राहणार आहेत. एक्स्पोच्या माध्यमातून नाशिकचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आयुक्तांना मिळाली आहे.

आयुक्त नाशिक गुंतवणूकीसाठी कसं महत्त्वाच शहर आहे , शहराची भौगोलिक परिस्थिती, पर्यावरण याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिषदेच्या माध्यमातून नाशिकसाठी गुंतवणूक देखील आयुक्तांना आणता येईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com