मनरेगा अंतर्गत कामांचा विशेष मोहिमेद्वारे शुभारंभ

मनरेगा अंतर्गत कामांचा विशेष मोहिमेद्वारे शुभारंभ

तीन लाख मनुष्य दिवस निर्मिती

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme) अंतर्गत नाशिक जिल्ह्यात (nashik district) सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता मनुष्य दिवस निर्मितीचे 18 लक्ष उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्यानुसार जिल्ह्यात आज रोजी 20.34 लक्ष उदिष्ट साध्य (110 टक्के) झालेले आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Collector Gangatharan D.) यांच्या मार्गदर्शनानुसार मंगळवारी (दि.६) संपूर्ण जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विविध कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

संपूर्ण जिल्ह्यात ही विशेष मोहीम (special campaign) यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Zilha Parishad Chief Executive Officer Ashima Mittal) यांनी जिल्हा परिषदेतील खाते प्रमुखांना नोडल अधिकारी (Nodal Officer) म्हणून नियुक्त केले आहे.

नाशिक जिल्ह्यात एकूण ८०३ कामांची सुरवात करण्यात येणार असून सर्व तालुक्यातील गट विकास अधिकारी (Group Development Officer) यांनी यासंदर्भात नियोजन केले आहे. या विशेष मोहिमेतून ३ लाख मनुष्य दिवस निर्मिती होणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme) अंतर्गत एकूण २६२ प्रकारच्या कामांचा समावेश होतो त्यामध्ये प्रामुख्याने मातोश्री शेत पाणंद रस्ते, सिंचन विहीर, जिल्हा परिषद शाळांना संरक्षक भिंत, जुनी भात शेती दुरुस्ती, फळबाग लागवड, बैल गोठा, शौषखड्डे इ. कामे सुरु अशी कामे जिल्हाभरात राबवली जाणार आहेत.

त्यामध्ये प्रामुख्याने अनु.जाती, अनु.जमाती, भटक्या जमाती, महिला कुटुंब प्रमुख्य, भुमीहीन मजुर, दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना लाभ देण्यात येतो. ग्रामीण भागातील गरिब व अल्प उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाना याद्वारे गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे.

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा नियोजन आराखडा व लेबर बजेट तयार करण्याची प्रक्रिया प्रगतीत असून या मोहिमेद्वारे पुढील वर्षाचे नियोजन करण्यासाठी देखील मोठा हातभार लागेल व जनजागृती होणेस मोठया प्रमाणात मदत होईल. अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

ग्रामस्थांनी सहभागी व्हावे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विशेष मोहिमेतून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी रोजगार हमीची कामे ही करण्यात येणार आहे, या मोहिमेत जास्तीत जास्त ग्रामस्थांनी सहभागी व्हावे.

-आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नाशिक

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com