ट्रीमिक्स काँक्रीटीकरण रस्ता विकास कामाचा शुभारंभ

ट्रीमिक्स काँक्रीटीकरण रस्ता विकास कामाचा शुभारंभ

नाशिकरोड | प्रतिनिधी Nashik Road

प्रभाग क्र. 19 मधील जुना ओढ रोड येथे 4 कोटी रुपयांचा ट्रीमिक्स काँक्रीटीकरण (Trimix concretization) रस्ता विकास कामाचा शुभारंभ (Commencement of road development work) खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांच्या हस्ते पार पडला. यावेळी शिवसेना नेते दत्त गायकवाड व माजी आमदार योगेश घोलप (Former MLA Yogesh Gholap) उपस्थित होते. जुना ओढा रोड येथील खर्जुल मळ्यातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था होती. प्रभागातील नगरसेविका जयश्री खर्जुल तसेच नगरसेवक संतोष साळवे, पंडित आवारे, बाजीराव भागवत यांनी या कामासाठी पाठपुरावा केला.

रस्त्याच्या भूमिपूजन (Bhumipujan) प्रसंगी बोलतांना त्प्रयांनी सांगितले की, प्रत्येक प्रभागात असे नगरसेवक असल्यास शहराचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही. वेगवेगळ्या पक्षातील नगरसेवक एका प्रभागात असताना देखील सर्व एकत्र येऊन जनतेसाठी विकासकाम करतात यापेक्षा मोठी आनंदाची बाब नाही असे त्यांनी नमूद केले.

यावेळी नगरसेवक संतोष साळवे, नगरसेविका जयश्री खर्जूल, नगरसेवक पंडित आवारे, नगरसेवक बाजीराव भागवत, नितीन खर्जूल, योगेश गाडेकर, केशव बोराडे, सुभाष मोरे, मंदा गवळी, मोहन खर्जूल, बाळासाहेब खर्जूल, सुनील अरिंगळे, भास्कर खर्जूल, विजय खर्जूल, धनाजी अरिंगळे, अरूण भोर, सुरेश नेहे,अमोल अरिंगळे, आदी उपस्थित होते

Related Stories

No stories found.