मनपा कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे कामकाज सुरू

महापौर सतीश कुलकर्णी यांची माहिती
नाशिक मनपा
नाशिक मनपा

नाशिक । Nashik

महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळत नसल्याने त्याचा मनपा कर्मचाऱ्यांवर कामकाजाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. यासाठी माननीय महापौर सतीश कुलकर्णी व मनपा पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन प्रशासन आयुक्त यांना वेळोवेळी पदोन्नती देणे बाबत पाठपुरावा केला असल्याने प्रशासनाच्या वतीने ०४ जानेवारी ते २१ जानेवारी पर्यंत विविध संवर्गातील पदोन्नतीचे कामकाज सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान कर्मचाऱ्यांना शंभर टक्के पद्धतीने पदोन्नती दिल्यास कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरून मनपा कामकाज सुरळीत चालण्यास मदत होणार आहे. याकरिता महापौर सतीश कुलकर्णी यांनी आयुक्त कैलास जाधव यांना दि.०४ जानेवारी रोजी लेखी पत्र देऊन सेवा जेष्ठता तपासून शंभर टक्के पद्धतीने पदोन्नती देण्यास सुचित केले आहे.

नाशिक महानगरपालिकेत तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांनी सन २०१३ मध्ये पदोन्नती दिल्यानंतर गेली सात ते आठ वर्षापासून कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहिले होते. नाशिक महानगरपालिकेचा ब संवर्गात समावेश झाल्याने आज मितीस जवळपास दीड ते दोन हजार विविध संवर्गातील पदे हे रिक्त होते.

नाशिक महानगरपालिकेत दर महिन्याला नियत वयोमानानुसार अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्त होत असून कर्मचाऱ्यांची संख्या दिवसागणिक कमी कमी होत असल्याने कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली.

याकरिता अनेक कर्मचारी पाठपुरावा करीत असल्याने महापौर यांनी पुढाकार घेऊन प्रशासनाला पदोन्नती समिती घेण्याबाबत आग्रही भूमिका घेतल्याने आता लवकरच विविध संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांना शंभर टक्के पद्धतीने पदोन्नती मिळणार असून कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com