प्राणवायू प्रकल्प कामाला सुरूवात

प्राणवायू प्रकल्प कामाला सुरूवात

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने ( possible third wave of corona ) त्या दरम्यान ऑक्सिजन (oxygen )तुटवडा भासू नये म्हणून इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन प्रकल्प उभारणीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.

आगामी काळात कोरोना संसर्ग होऊन जर एखाद्या रुग्णाला ऑक्सीजनची गरज भासली तर त्याला तातळ ग्रामीण रुग्णालयातच निर्मिती झालेल्या प्राणवायु मिळावा, या उद्देशाने शासनाकडून हे प्रकल्प उभारण्यात येत आहे. व ऑक्सीजन अभावी नागरीकांचा जीव जाऊ नये म्हणुन सर्वच शासकीय रुग्णालयात ऑक्सीजनचे प्लँट उभारण्याची गरज आहे.

ऑक्सिजन प्रत्येक रूग्णांना मोफत मिळावा यासाठी सरकारचा प्रयत्न आहे ,असे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ ( Assembly Vice President no. Narhari Jirwal ) यांनी केले. इगतपुरी शहरातील ग्रामीण रुग्णालयात आमदार हिरामण खोसकर यांनी पाठपुरावा करून मंजुर झालेले ऑक्सीजन प्लँटच्या कामाचा शुभारंभ झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात, तहसिलदार परमेश्वर कासुळे, उपनगराध्यक्ष नईम खान, माजी जि. प. सदस्य गोरख बोडके, अँड.संदीप गुळवे, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस भास्कर गुंजाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महेश शिरोळे, शहराध्यक्ष वसीम सय्यद, जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक किरण फलटणकर, ग्रामिण रूग्णालयाच्या अधिक्षीका डॉ. स्वरुपा देवरे, तालीम संघाचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने,

पोलीस निरीक्षक वसंत पथवे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संतोष सोनवणे, सहयाद्री अदिवासी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल गभाले, काँग्रेसचे युवा नेते सोमनाथ भोंडवे, सत्तार मणियार, गणेश कवटे, भाऊ पासलकर, रुग्णालयाच्या पूनम पाटील, हिरकणी मोरे, डॉ. दिलीप व्यवहारे, डॉ. राहुल खताळ, डॉ. मुकेश सोनवणे विशाल आदमाने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com