लासलगाव रेल्वे स्टेशन रस्ता कामाचा शुभारंभ

लासलगाव रेल्वे स्टेशन रस्ता कामाचा शुभारंभ

लासलगाव । वार्ताहर Lasalgaon

टाकळी विंचूर (Takli Vinchur) येथे पं.स. चे माजी सभापति तथा विद्यमान सदस्य शिवा सुरासे (Shiva Surase) यांच्या पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) 15 वित्त आयोगातून (Finance Commission) पवार वस्ती ते जुना रेल्वे स्टेशन (Railway station) रोड रस्ता खडीकरण व मजबूतीकरण कामाचा शुभारंभ लासलगाव कृऊबा चे मा. संचालक सुखदेव राजळे, लक्ष्मण जाधव,

कांदा व्यापारी गंगाधर पवार, बाबूराव गांगुर्डे, भास्कर पठारे, शंकर शिंदे यांच्या हस्ते तसेच मा.पं.स. सभापति शिवा सुरासे, सरपंच अश्विनी जाधव, उपसरपंच ज्ञानेश्वर मोकाटे, ग्रा.पं. सदस्य ज्योती सुराशे, रविराज शिंदे, राम बोराडे, केशव जाधव, संगीता पाचोरकर, हरीश गवळी, नाना राजगिरे, ललिता पठारे, दीपाली लाड, पूनम आमले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी बोलताना सुराशे म्हणाले की, पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) माध्यमातून प्रत्येक गावात निधी (fund) देण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काळात देखील राहिलेल्या रस्त्यांची कामे व इतर मुलभूत सुविधांना प्राधान्य देवून ती पूर्ण करून घेवू. खडकमाळेगाव गणातील गावांना शासनाकडून निधी आणण्याचा पुरेपुर प्रयत्न करू असेही सुरासे म्हणाले.

याप्रसंगी सतीश गांगुर्डे, उत्तम पवार, बापू जाधव, चांगदेव शिंदे, अंबादास पठारे, चांगदेव पवार, संजय पवार, अशोक आमले, भाऊसाहेब पवार, सुरेश गांगुर्डे, दिलीप गांगुर्डे, सुभाष शिंदे, प्रमोद शिंदे, भारत पवार, दत्तू पवार, विकास पवार, रामदास राजळे, रामनाथ सुराशे, रवींद्र पाचोरकर, भाऊराव राजोळे, एकनाथ राजोळे, पुंडलिक जाधव, जयवंत पठारे, दत्तू शिंदे, रोहित पठारे, शिवनाथ पठारे, रंगनाथ गांगुर्डे, उमेश गांगुर्डे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मनोगत व्यक्त करीत गणात झालेल्या व प्रस्तावित कामांची माहिती देत शिवा सुरासे यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा आवर्जुन उल्लेख करीत त्यांचे कौतुक केले. यावेळी टाकळी ग्रामपंचायत उपसरपंच ज्ञानेश्वर मोकाटे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com