नाशिक । Nashik

जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला तालुक्याच्या ठिकाणी प्रारंभ झाला असून पुढील काही वेळात निकाल यायला सुरवात होईल. दरम्यान ५६५ ग्रामपंचायतीमध्ये गाव कारभारी कोण होणार? याचा फैसला आज होत असून जिल्ह्यातील जनतेत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. साधारण दुपारी पाच वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

तर सर्व मतमोजणी केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच मतमोजणी नंतर संवेदनशील गावांमध्ये पोलीसांचे लक्ष राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.

सिन्नर : राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे गाव असलेल्या देवपूर ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल लागला असून राजेश गडाख यांच्या गटाला 11 तर नवनाथ गडाख व विजय गडाख 0 यांच्या पॅनलचा धुव्वा उडवला.

पहिल्या फेरीचा निकाल अर्ध्या तासात हाती आला असून दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे.पाटोळेत प्रभाग तीन मधील उमेदवाराचे चिट्ठीने भवितव्य ठरले.

दिंडोरी : भाऊ घुमरे उंबरखेडमधून ११४ मतांनी विजयी

नाशिक : सैय्यद पिंपरी ग्रामपंचायतच्या 6 जागांचे निकाल जाहीर; 17 पैकी 6 जागांवर काँग्रेस प्रणित ग्रामविकास पॅनेलचे उमेदवार विजयी

निफाड ला मतमोजणी सुरू

निफाड तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

सिन्नर तालुका

देवपूर ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल लागला असून राजेश गडाख यांच्या गटाला 11 तर नवनाथ गडाख व विजय गडाख 0 यांच्या पॅनलचा धुव्वा उडवला. पाटोळेत प्रभाग तीन मधील उमेदवाराचे चिट्ठीने भवितव्य ठरले.