विकासासाठी एकत्र यावे : ना. भुसे

विकासासाठी एकत्र यावे : ना. भुसे

उमराणे । वार्ताहर Umrane

निवडणुका (election) संपल्यानंतर राजकिय अभिनिवेश बाजूला सारून विकासाला प्राधान्य देत जनतेचे प्रश्न सोडवणे ही आपली जबाबदारी आहे. पंचक्रोशीतील विकासकामांसाठी (development work) सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांनी केले.

उमराणे (umrane) येथे ना. भुसे व आ.डॉ. राहुल आहेर (mla dr. rahul aher) यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन (Bhumipujan) व लोकार्पण (Dedication) झाले, त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ना. भुसे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व्यापारी असोसिएशनचे (District Merchants Association) अध्यक्ष खंडू देवरे (khandu deore) होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) प्रतिमेचे पूजन झाले. ना. भुसे पुढे म्हणाले, राजकीय जीवनात पदे येतात आणि जातात. परंतु लाभलेल्या पदांचा समाजासाठी उपयोग केला पाहिजे.

उमराणे बाजार समिती निवडणुकीत (Umrane Market Committee Election) गेल्या चाळीस वर्षांपासून एकमेकांच्या विरोधात लढणारे माजी जि.प. सदस्य प्रशांत देवरे व माजी सभापती विलास देवरे यांनी एकत्र येत बिनविरोध निवड केल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. यापुढेही दोघा नेत्यांनी स्व. निवृत्ती देवरे व स्व. रामदास देवरे यांच्याप्रमाणे उमराण्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

याप्रसंगी ना. भुसे व आ.डॉ. आहेर यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या उमराणे (umrane) ते गिरणारे (girnare) रस्ता रुंदीकरण (road widening) -डांबरीकरण (Asphalting), धनदाई मंदिर, गणपती मंदिर ते उड्डाणपूल (flyover), रस्ता काँक्रिटीकरण (Road concreting) कामाचा शुभारंभ तसेच शनिमंदिर चौफुली ते आई माऊली मंदिर परसुल नदीवर बांधलेल्या पुलाचे लोकार्पण सोहळा करण्यात आले. माजी जि.प. सदस्य प्रशांत देवरे यांनी प्रास्ताविक केले.

आ.डॉ. राहुल आहेर, जि.प. सदस्य यशवंत शिरसाठ, उपसभापती धर्मा देवरे, माजी सभापती विलास देवरे, सुनिल देवरे यांची भाषणे झालीत. याप्रसंगी उमराणे ग्रामपंचायतीच्या वतीने स्व. निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत बिनविरोध निवडून आलेले सोसायटी गटातील प्रशांत देवरे, दादाजी खैरनार, यशवंत ठाकरे, सतीशकुमार ठाकरे, राजेंद्र देवरे, दीपक निकम, मिलिंद शेवाळे, बेबीबाई खैरनार, सुमनबाई पवार, देवानंद वाघ,

अनिता बस्ते, ग्रामपंचायत गटतील विलास देवरे, प्रवीण अहिरे, अंजली केदारे, वैशाली आहेर, व्यापारी गटातील सुनिल देवरे, प्रवीण देवरे, हमाल मापारी गटातील साहेबराव देवरे या संचालकांसह माजी सरपंच प्रकाश ओस्तवाल, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष संदेश बाफणा, पो.नि. दिलीप लांडगे व निलेश सावकार यांचा सत्कार ग्रा.पं. सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सुनिल देवरे यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com