नाशकात पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कठोर कारवाई

नाशकात पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कठोर कारवाई

नाशिक | Nashik

नाशिक शहरात (Nashik City Crime) वाढत असलेल्या गुन्हेगारीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (CP Ankush Shinde) यांनी दोन दिवसांपुर्वी सातपुर येथील गोळीबार प्रकरणातील ८ संशयितांवर थेट मोक्का लावण्याची कारवाई केली.

नाशकात पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कठोर कारवाई
अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारलं; म्हणाले, आमच्या पक्षाचे...

तर सोमवारी रात्री शहरातील सर्व पोलीस ठाणे हददीतील अचानक कोम्बींग ऑपरेशन (Combing Operation) राबवून कारवाई करण्यात आली. यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षकसह शेकडो पोलीस सहभागी झाले होते. हे कोम्बिंग ऑपरेशन हे रात्री ११ वाजता सुरू करण्यात आले होते. तर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

नाशकात पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कठोर कारवाई
अजित पवार भाजपमध्ये जाणार? शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

यावेळी पोलीस उपआयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा. आयुक्त वसंत मोरे यांच्यासह गुन्हेशाखा, युनिट १ व २ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी व अंमलदार तसेच गुंडा पथक, अंमली पदार्थ विरोधी पथक, खंडणी पथक, शस्त्र व दरोडा विरोधी पथक या पथकातील अधिकारी व अंमलदार, ३ पोलीस उपआयुक्त, ५ सहा. पोलीस आयुक्त, १५ पोलीस निरीक्षक, २९ सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, २७० पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. यावेळी हिस्ट्रीशीटर यांच्या राहण्याच्या संभाव्य ठिकाणांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांची पोलीस ठाण्यांमध्ये चौकशी करण्यात आली.

नाशकात पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कठोर कारवाई
अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; केली 'ही' मागणी

दरम्यान, आडगांव, म्हसरुळ, पंचवटी, भद्रकाली, मुंबईनाका, सरकारवाडा, गंगापुर, सातपुर, अंबड, इंदिरानगर, नाशिकरोड , उपनगर, देवळाली कॅम्प या पोलीस ठाणे हद्दीत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या नेतृत्वात तर पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी फुलेनगर पंचवटी, निलगिरीबाग, नांदुरनाका, अश्वमेध नगर, बोरगड, म्हसरूळ, भिमवाडी, पंचशीलनगर, बजरंगवाडी, नागसेननगर, मल्हारखान, रविवार पेठ, संतकबीर नगर, आनंदवली, शिवाजी नगर परिसर तसेच पोलीस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या नेतृत्वाखाली अंबड पोलीस ठाणे परिसर, प्रबुध्द नगर, संतोषीमाता नगर, श्रमीकनगर, म्हाडा वसाहत, राजीव नगर, पाथर्डीगाव, सिन्नर फाटा, जेलरोड, रेल्वे स्टेशन परिसर, नाशिकरोड, सुंदरनगर, गांधीनगर, नारायण बापु नगर, कॅथे कॉलनी, भगुर, संसरी गाव दे. कॅम्प परिसर या भागात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

नाशकात पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कठोर कारवाई
संजय राऊतांचा अजित पवारांबाबत मोठा दावा; म्हणाले, भाजपकडून त्यांच्या...

१४५ जणांवर कारवाई

कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हददीत एकूण २१७ रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले असता त्यापैकी १४५ गुन्हेगार मिळून आल्याने त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये हत्यार बाळगणार्‍या ४ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तर हद्दपार केलेल्यांपैकी २ जण शहरात मिळाले असून त्यांच्याविरुद्ध मपोका कलम १४२ प्रमाणे कारवाई करण्यात आली. तसेच अवैध दारू विक्री करणार्‍यांविरूद्ध कारवाई करून शेकडो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

यापुढे देखील पोलीस आयुक्तालय हद्दीत अचानकपणे कोम्बींग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.

- अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com