चीन सीमेवर कमांडिग ऑफिसर म्हणून कार्यरत असणारे कर्नल पराग गायधनी यांचे मुंबईत निधन

चीन सीमेवर कमांडिग ऑफिसर म्हणून कार्यरत असणारे कर्नल पराग गायधनी यांचे मुंबईत निधन

नाशिक रोड | प्रतिनिधी | Nashik Road

नाशिकरोड (nashik road) येथील रहिवासी आणि सध्या अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) चीन सीमेवर (China Border) कमांडिग ऑफिसर (Commanding Officer) म्हणून कार्यरत असणारे

कर्नल पराग रामचंद्र गायधनी (Colonel Parag Ramchandra Gaydhani) (50) यांचे दीर्घ आजाराने मुंबईतील (Mumbai) नौदलाच्या अश्विनी रुग्णालयात (Ashwini Hospital of Navy) आज निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, दोन बहिणी, भाचे असा परिवार आहे.

नाशिकरोड (nashik raod) मसापचे कार्याध्यक्ष व वास्तुविशारद उन्मेष गायधनी यांचे ते बंधु होत. पराग गायधनी यांच्या पत्नी रश्मी या एअर इंडियामध्ये (Air India) वरिष्ठ वैमानिक होत्या. त्यांचे गेल्या फेब्रुवारीत नाशिकमध्ये (nashik) अपघाती निधन (Accidental death) झाले होते. कर्नल पराग गायधनी यांना आसाम रायफलतर्फे अश्विनी रुग्णालयात मानवंदना देण्यात आली.

उद्या (ता.24) सकाळी साडेनऊ वाजता नाशिकरोड (nashik road) येथील आंबेडकर रोडवरील त्यांच्या निवासस्थानी लष्करातर्फे मानवंदना दिली जाईल. त्यानंतर अंत्ययात्रा सुरु होईल. दसक येथे पुन्हा मानवंदना दिल्यानंतर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com