नाशिक | Nashik

नववी ते बारावीचे वर्ग नोव्हेंबरपासून सुरू झाल्यानंतर आता महाविद्यालयेही लवकरच सुरू केले जाणार आहेत. कराेना परिस्थितीचा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आढावा घेऊन विद्यापीठे, महाविद्यालये, अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या ५० टक्के उपस्थितीत सुरू करण्याविषयीचा निर्णय २० जानेवारीपर्यंत घेण्यात येणार आहे.

महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी जिल्ह्याधिकारी, विद्यापीठांचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून तेथील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील वसतिगृहांची तपासणी, क्वारंटाईन सेंटरसाठी देण्यात आलेल्या महाविद्यालयांची सद्यस्थिती याची पाहण्यात येईल.

महाविद्यालयात येणारे विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुरक्षा, त्यांचे आरोग्य याला सर्वप्रथम प्राधान्य असल्याचे सांगून करोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांसाठी वेगळी नियमावली तयार करण्याचा विचारही सुरू आहे.

प्रत्येक जिल्ह्यात मुक्त विद्यापीठप्रत्येक जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार असून गोवा राज्यात मुक्त विद्यापीठाची शाखा सुरू करण्याविषयी मुख्यमंञी प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा सुरू आहे. सध्या पुणे, नागपूर, रत्नागिरी, अमरावती, सोलापूर, नांदेड सह राज्याच्या सीमाभागातही मुक्त विद्यापीठ केंद्र सुरू होणार आहे.