पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तरुणीचा मृत्यू

पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तरुणीचा मृत्यू

उगाव | प्रतिनिधी | Ugav

उगाव खेडे (Ugav khede) येथील पुलावरून (Bridge) एक महाविद्यालयीन तरुणी स्कुटीवरून कॉलेजला जात असतांना तोल जाऊन पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास तन्वी विजय गायकवाड (Tanvi Vijay Gaikwad) (१७) हल्ली मुक्काम रा. रुई ता.निफाड ही तरुणी उगाव खेडे येथील पुलावरून स्कूटीने रानवड येथे कॉलेजला जात असतांना ती स्कूटीसह पाण्यात वाहून गेली.

त्यानंतर स्थानिकांनी तिला पाण्यातून (water) तात्काळ बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पंरतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ती पाण्यात वाहून गेली. यानंतर तन्वी शिवडी नदीच्या पुलावर (Shivdi River) आढळून आली.

दरम्यान, पुढील उपचारासाठी तिला तात्काळ निफाड उपजिल्हा रुग्णालयात (Niphad Hospital) दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच सध्या शवविच्छेदनाची (Autopsy) प्रक्रिया सुरु आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com