
दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक (Krantiveer Vasantrao Narayanarao Naik ) शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती वैचारिक प्रबोधनातून साजरी केली.
विद्यार्थ्यांना महामानवांचे कार्य समजावे यासाठी वैचारिक जागर करण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यासाठी व्याख्याते म्हणून चेतन गांगुर्डे यांना निमंत्रित करण्यात आले होते.
त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकीत त्यांच्या कर्तुत्वाला उजाळा दिला. त्यामुळे या दोन्ही महामानवांची जयंती खऱ्याअर्थाने वैचारिक उत्सव ठरला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र सांगळे यांनी विद्यार्थ्यांना चांगले वक्ते होण्याचा सल्ला देतानाच महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे विद्यार्थ्यांनी वाचन करावे ज्यामुळे विद्यार्थ्यांची वैचारिक बैठक तयार होईल असे सांगितले.
यावेळी सचिन आव्हाड, मयूर गांगुर्डे, प्रा. डॉ. प्रल्हाद दुधाणे, प्रा. दिलीप गांगुर्डे, प्रा. तुकाराम भवर यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय वृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.