जिल्हाधिकाऱ्यांच्या कर्तृत्वाला रेखाचित्रातून सलाम

जिल्हाधिकाऱ्यांच्या कर्तृत्वाला रेखाचित्रातून सलाम

ओझे | वार्ताहर Oze

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या कर्तृत्वाला रेखचित्रातून येथील चित्रकार डॉ. राजीव देशमुख (Dr Rajiv Deshmukh) यांनी सलाम केला आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांचे कर्तृत्व संपूर्ण जिल्ह्यातील जनतेला ज्ञात असून गेल्या दोन वर्षांत त्यांनी कोवीड १९ कालावधीत केलेले उत्कृष्ट नियोजन व कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे...

संपूर्ण जिल्ह्यातील जनतेच्या वतीने रेखाचित्राची भेट जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना चित्रकार डॉ. राजीव देशमुख यांच्या हस्ते भेट देण्यात आले. यावेळी दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष कथार उपस्थित होते.

चित्रकार डॉ. देशमुख यांनी यापूर्वी पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, कलाकार, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित व्यक्ती आदींसह शैक्षणिक, राजकीय, सहकार, शेती, सामाजिक, कला, क्रीडा या सर्वच क्षेत्रातील असंख्य लोकांचे स्केच तयार करून त्या नागरिकांच्या कार्याचा गौरव केला आहे.

जिल्हाधिकारी मांढरे यांनी डॉ राजीव देशमुख यांच्या कलेचे कौतुक करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com