Video : ...म्हणून रेमडेसिवीर इंजेक्शनचा नाशकात तुटवडा

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे स्पष्टीकरण
Video : ...म्हणून रेमडेसिवीर इंजेक्शनचा नाशकात तुटवडा

नाशिक | प्रतिनिधी

रेमडेसिवीर इंजेक्शनची जिल्ह्यात जितकी मागणी आहे, त्या तुलनेने १० ते १५ टक्केच पुरवठा होत आहे. त्यामुळे अनेक रुग्ण वंचित राहताना दिसून येत आहेत. गेल्या वर्षी आढळून आलेल्या करोना रुग्णांमध्ये सव्वादोन लाख रुग्ण करोनामुक्त झाले होते. यात रेमडेसिवीर इंजेक्शन घेऊन बरे झालेले रुग्ण नगण्य आहेत. त्यामुळे सध्या रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी धावाधाव करत असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे हा तुटवडा जाणवत असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे म्हणाले.

यंदा रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. त्यामुळे या इंजक्शनला मोठी मागणी निर्माण झाली आहे. तसेच मागणी वाढल्याने त्या तुलनेने पुरवठा मात्र होत नाही. अनेक ठिकाणी हे इंजेक्शन उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक रुग्णांची नाराजी दिसून येत आहे.

नाशिक मध्ये ३० ते ३५ हजार इंजेक्शनची मागणी आहे. मात्र, ७ हजार देखील पुरवठा झालेला नाही. म्हणून वंचित राहणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसते.

औषध निर्मात्या कंपन्यांच्या ठिकाणी आपले अधिकारी ठाण मांडून बसले आहेत. तेही जिल्ह्यात हे इंजेक्शन कसे मिळेल याच्यासाठी प्रयत्न करत आहेत.

आपल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त कोटा वाढवून घेतला आहे. जास्तीत जास्त इंजेक्शन कसे मिळेल यासाठी प्रयत्न सध्या सुरु आहेत. आपल्या सिस्टीममध्ये इंजेक्शन आणून कसे रुग्णांना दिले जातील यासाठी प्रयत्न केले जात असून गरजू रुग्णांना या इंजेक्शनचा प्रभावी वापर कसा केला जाईल याकडेदेखील सध्या लक्ष असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com