नायलॉन मांजा विकणाऱ्यांना कलेक्टरांचा निर्वाणीचा इशारा

नायलॉन मांजा विकणाऱ्यांना कलेक्टरांचा निर्वाणीचा इशारा
नायलॉन मांजा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मकर संक्रांतीनिमित्त (Makar Sankranti) पतंगाला ढील देण्यासाठी अनेकजन सज्ज आहेत. पतंग विक्रीसाठी वेगवेगळ्या धाटणीचे पतंग बाजारात उपलब्ध झाले आहेत. मांजा आणि पतंग घेण्यासाठी मोठ्या संख्येने नाशिककरांची गर्दी होत आहे. मात्र, नायलॉनचा मांजा (nylon manja) वापरला जिल्ह्यात बंदी असून नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईदेखील करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे....

नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेकांचे गळे चिरले गेल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक पक्ष्यांचेही बळी या मांजाने घेतले आहेत. त्यामुळे धोकेदायक ठरणाऱ्या या मांजावर बंदी घालण्यात आली आहे.

नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी आणणाऱ्या व्यावसायिकांनी विनाकारण आर्थिक नुकसान करून घेऊ नये असेही जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांनी म्हटले आहे.

अशोक स्तंभ ते रविवार कारंजा, मेनरोड परिसर या भागात अनेक पतंग विक्रीची दुकाने सुरु झाली आहेत. याठिकाणी लहानग्यांची वेगवेगळया धाटणीची पतंग खरेदी करण्यासाठी गर्दी केलेली दिसून येत आहे. सरासरी २० ते ३० टक्के यंदा पतंगाची किंमती वाढलेल्या आहेत.

संक्रांतीला नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वापर केला जातो. परंतू त्यावर बंदी आहे हे पुन्हा नमूद करण्यात येत आहे. संबंधित विभाग कारवाई करतीलच, परंतु नागरिकांनी आपल्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी त्यापासून दूर राहावे. केव्हाही साठा जप्त केला जाऊ शकत असल्याने दुकानदारांनी याचा साठा करून आर्थिक नुकसान करून घेऊ नये.

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com