कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत (Farmers) कृषी योजनांचा लाभ (Agricultural schemes) पोहोचविण्यासाठी या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Collector Gangatharan D.) यांनी दिल्या आहेत...

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (Collector Office) मध्यवर्ती सभागृहात आयोजित कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय अभियान समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Leena Bansod), कृषी उपसंचालक कैलास शिरसाठी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, आत्मा प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी रमेश शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अजित सुरसे, मालेगाव उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, निफाड जिल्हा विस्तार केंद्राचे कवक शास्त्रज्ञ डॉ. बबनराव झाल्टे, तंत्र अधिकारी जितेंद्र शहा यांच्यासह सर्व तालुका कृषी अधिकारी, राष्ट्रीयकृत व सहकारी बँक आणि विमा कंपनीचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकाऱ्यांची सूचना
...अखेर अनुराधा सिनेमागृह जमीनदोस्त; जाणून घ्या ४७ वर्षांचा इतिहास

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यावेळी म्हणाले की, कृषी विभागाच्या योजना या शेतकऱ्यांच्या हितासाठी व विकासासाठी आहेत. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान व योजनांची कृषी विभागाने प्रभावीपणे जनजागृती करावी जेणेकरून या योजनांचा लाभ सर्व तळागाळातील शेतकरी घेऊ शकतील.

शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने एकच पीक न घेता पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. यासाठी तालुकास्तरावर शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना क्षेत्रनिहाय आपल्या शेतात कोणती पिके घेणे शक्य आहेत, याची माहितीही देण्यात यावी.

कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकाऱ्यांची सूचना
पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा 'मास्टर प्लॅन'; घेतला 'हा' निर्णय

जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागात भात लागवडीचे क्षेत्र वाढविण्याचे दृष्टीने कृषी विभागाने उपाययोजना कराव्यात. तसेच जिल्हास्तरीय 29 महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्रांची कामे ऑगस्ट 2022 अखेर पूर्ण करावीत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कृषी योजनांचे परिपूर्ण प्रस्ताव संगणकीय प्रणालीवर अपलोड करावेत

कृषी योजनांच्या लाभासाठी सादर केलेल्या प्रस्तावांमध्ये बऱ्याच वेळा त्रूटी असल्याने असे त्रूटीयुक्त प्रस्ताव संगणकीय प्रणालीवर अपलोड केल्यास यात लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी विलंब होतो.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया (PMFME) योजनेसह इतर योजनांचे परिपूर्ण प्रस्ताव संगणकीय प्रणालीवर अपलोड केल्यास प्रक्रिया लवकर पूर्ण होवून लाभार्थ्यांना वेळेत योजनांचा लाभ घेता येईल.

यामुळे प्रलंबित अर्जांची संख्या परिणामी कमी होईल. बँकस्तरावरील प्रलंबित अर्जांची आवश्यक पूर्तता करून ते निकाली काढावेत, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Leena Bansod) यांनी उपस्थित बँक अधिकारी व प्रतिनिधींना दिल्या आहेत.

कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकाऱ्यांची सूचना
सत्ताधारी भाजपचाच शिंदे गटाला धक्का; 'या' तीन नगरसेवकांची घरवापसी

या कृषी योजनांचा घेतला आढावा

बैठकी दरम्यान जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, कृषी यांत्रिकीकरण, क्रॉप सॅप अंतर्गत कापूस पिकांवरील गुलाबी शेंदरी बोंड आळी, कोरडवाहू (शेती) क्षेत्र विकास कार्यक्रम, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (सूक्ष्म सिंचन), प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाचे उन्नयन योजना, प्रधानमंत्री फसल विमा योजना, हवामान आधारित फळपीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, महावेध अंतर्गत हवामान केंद्र उभारणी या योजनांचा सादरीकरणाद्वारे यावेळी आढावा घेतला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com