नाशिक जिल्ह्यातील बँका उद्या रात्री 12 पर्यंत राहणार सुरू; हे आहे कारण...

नाशिक जिल्ह्यातील बँका उद्या रात्री 12 पर्यंत राहणार सुरू; हे आहे कारण...

नाशिक | Nashik

वित्तीय वर्षाचे शासनाचे आर्थिक व्यवहार (financial transactions) पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील भारतीय स्टेट बँक (State bank), देना बँक (Dena Bank) आणि शासकीय व्यवहार (Government Finance) हाताळणाऱ्या अन्य बँक शाखा उद्या 31 मार्च 2022 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Nashik Collector Gangatharan D) यांनी जारी केले आहेत....

या संदर्भात आज (दि ३०) रोजी सायंकाळी आदेश जारी करण्यात आले आहेत. यानुसार, शासनाकडून विविध शासकीय विभाग व कार्यालयांची वित्तीय वर्ष अखेरच्या दिवशी उशिरापर्यंत प्राप्त झालेले अनुदान खर्ची टाकून जिल्हा कोषागार व तालुका उपकोषगार कार्यालयात देयके सादर केली जातात.

त्याप्रमाणे वितरीत होणारी देयके व धनादेश स्टेट बँकेत वटवून रक्कम काढणे, महसुली उत्पन्नाच्या (revenue income) रकमा शासनाकडे भरणा करणे यासाठी पुरेसा अवधी मिळणे आवश्यक आहे.

यासाठी जिल्ह्यातील भारतीय स्टेट बँकेची कोषागार, नाशिक रोड (nashikroad) व देवळाली कॅम्प (Deolali Camp) शाखा (branch) व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी असलेली स्टेट बँक (State bank) शाखा तसेच तालुका सुरगाणा (Surgana) येथील देना बँक (Dena Bank) व शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या अन्य बँक शाखा यांची कार्यालये रात्री 12.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Gangatharan D collector nashik) यांनी दिले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com