वाहनधारकांकडून हजारोंचा दंड वसूल; दुचाकीचोरीकडे मात्र दुर्लक्ष

वाहनधारकांकडून हजारोंचा दंड वसूल; दुचाकीचोरीकडे मात्र दुर्लक्ष

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

दुचाकी चोर्‍यांच्या (Bike thieves) प्रमाणात वाढ झाल्याने सिन्नर पोलिसांनी (sinnar police) शहरातील विविध भागात बेशिस्त वाहनधारकांसह वाहनाचे कागदपत्रे (Documents) नसलेल्या

वाहनधारकांवर कारवाई (Action against motorists) करत आठवडाभरात 30 हजारांचा दंड वसूल (Collection of fine) केला. पोलिसांच्या अचानकपणे होत असलेल्या कारवाईमुळे वाहनधारकांचीही चांगलीच तारांबळ उडत आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात (rural area) दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक शहाजी उमाप (Superintendent of Police Shahaji Umap) यांच्या आदेशान्वये सिन्नर पोलिसांकडून वाहनधारकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. चोरीच्या दुचाकींसह चोरट्यांचा शोध लावण्यासाठी शहरातील आडवा फाटा, बसस्थानक परिसर, मारुती मंदिर, संगमनेर नाका, वावी वेस परिसरात पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनधारकांची तपासणी करण्यात येत आहे.

दुचाकीधारकांमध्ये अनेक अल्पवयीन मुले दुचाकी चालवताना दिसून येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हीच मुले रस्त्याने सुसाट वाहने चालवत असल्याचे चित्रदेखील बघायला मिळते. ट्रिपल सीट, विनाहेल्मेट, बेशिस्त पार्किंग, सीटबेल्ट न लावणे, विनाक्रमांकाच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई (Penal action) करण्यात येत आहे. गेल्या सहा दिवसांत पोलिसांकडून अशा वाहनधारकांकडून 30 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

या कारवाईत निरीक्षक मुटकुळे यांच्यासह सहाय्यक निरीक्षक विजय माळी, उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, जी. व्ही. सारुक्ते, रवींद्र चिने, समाधान बोर्‍हाडे, के. डी. पवार यांनी ही कारवाई केली. यापुढे शहर परिसरात नियमितपणे ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती निरीक्षक मुटकुळे यांनी दिली.

हेल्मेट, सीटबेल्ट जनजागृती

ग्रामीण भाग असल्याकारणाने येथील दुचाकीधारक हेल्मेट व चारचाकीचालक सीटबेल्ट लावण्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र यामुळे अपघातात मार लागल्याने अनेकांना जीवही गमवावा लागतो. मात्र आता सिन्नर पोलिसांनी हेल्मेट व सीटबेल्टबाबत जनजागृती व्हावी व वाहनधारकांनी त्याचा नियमित वापर करावा यासाठी पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जेणेकरून इतर वाहनधारकही याकडे गांभीर्याने लक्ष देतील.

दिवसाला एक दुचाकी लंपास

गेल्या चार दिवसांत सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल सात दुचाकी लंपास झाल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कामानिमित्त शहरात येणार्‍यांच्या दुचाकी अवघ्या 15 मिनिटांत चोरी होत असल्याने हे सराईत चोरट्यांचेच काम असल्याचे दिसत आहे. गेल्या महिनाभरात तालुक्यात जवळपास 30 दुचाकी चोरी झाल्याचे निदर्शनास आले आहे. घराफोडींच्या घटना थांबल्या असल्या तरी चोरटे आता दुचाकींवर हात साफ करत असल्याने या चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com