बोचऱ्या थंडीने नाशिककर हैराण

बोचऱ्या थंडीने नाशिककर हैराण

नाशिक | प्रतिनिधी Nashik

दोन दिवसांपासून बोचर्‍या थंडीने नाशिककर गारठले आहेत. किमान तापमानाचा पारा किमान १४.६ अंश सेल्सियसवर पोहोचले असतानाही बोचरी थंडी नाशिककरांना सतावत आहे....(cold in nashik city)

बोचऱ्या थंडीने नाशिककर हैराण
Sindhudurg District Bank Election Results : सिंधुदुर्गात जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचं वर्चस्व, महाविकास आघाडीला धक्का

दिवसरात्र वाहणार्‍या गार वार्‍यांनी हुडहुडी भरली आहे. स्वेटर, कानटोेपीशिवाय फिरणे अशक्य झाले आहे. कडाक्याच्या थंडीमुळे बाजारपेठाही ओस पडलेल्या दिसून येत आहेत. रात्री आठनंतर वर्दळ असलेला गोदाकाठ गेल्या दोन दिवसांपासून निर्मनुष्य दिसून येत आहे.

बोचऱ्या थंडीने नाशिककर हैराण
जनता की बात - प्रभाग क्र ३ : मूलभूत सुविधांसह सुरक्षा देणारा लोकप्रतिनिधी हवा

उबदार कपड्यांची खरेदीसाठी मेनरोड (Main road), शालीमार (Shalimar) परिसरातील बाजारपेठेत मोठी गर्दी झालेली दिसून येत आहे. (Huge Crowd in Nashik) नाशकात या हंगामातील सर्वात नीचांकी तापमान (Minimum Temperature ) निफाडमध्ये (Niphad) ८.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. या थंडीचा रब्बी हंगामातील गहू, कांदा, हरभरा, ज्वारी या पिकांबरोबरच फळबागांना लाभ होत आहे, मात्र द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढली आहे.

नाशकात या हंगामातील सर्वात निच्चांकी तापमान गेल्या आठवड्यात नोंदवले गेले होते.. किमान तापमानासोबतच कमाल तापमानदेखील नाशिकमध्ये खालावले आहे. या वातावरणाचा रब्बी हंगामातील गहू, कांदा, हरभरा, ज्वारी या पिकांबरोबरच फळबागांनाही लाभ होत आहे. यामुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

बोचऱ्या थंडीने नाशिककर हैराण
जिल्ह्याला अतिवृष्टीग्रस्तांसाठी उर्वरीत निधी उपलब्ध

दोन दिवसापसुन वाहणारे थंंड वारे गारठ्यात अधिक भर घालत आहेत. थंडीपासून बचावासाठी कानटोपी, उपरणे, मफलर, स्वेटर, जर्किंग, हातमोजे , पायमोजे, आदींचा वापर करताना दिसत आहेत. थंडीचा जोर संक्रांतीपर्यंत असाच राहील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे खारीक, खोबरे, सुका मेवा यांना मागणी अजुन पंधरा दिवस कायम राहणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com