
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्हा परिषदेला (zilha parishad) 2021-22 मध्ये जिल्हा नियोजन समितीकडून (District Planning Committee) प्राप्त झालेल्या नियतव्ययातून मागील वर्षी नियोजन केलेल्या कामांपैकी जवळपास 118 कोटी रुपये निधी (fund) डिसेंबरअखेर अखर्चित आहे.
या निधीतील कामांसाठी आचारसंहिता (ethics) शिथील करावी, यासाठी राज्य निवडणूक आयोगाची (State Election Commission) परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आहे. गेले वर्ष स्थगीती, अतीवृष्टी (heavy rain) नंतर आता जानेवारी अखेरपर्यंत पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची (election) आदर्श आचारसंहिता लागु यामुळे निवीदी (tender) प्रक्रिया राबवणे, कार्यारंभ आदेश देणे ही कामे करण्यावर निर्बंध आले आहेत.
परिणामी हा निधी (fund) मार्च अखेरपर्यंत खर्च होणे अवघड दिसत असल्यामुळे जिल्हा परिषदेने (zilha parishad) या निधीतील कामांसाठी आचारसंहिता शिथील करावी, यासाठी राज्य निवडणूक आयोगाची परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पुढील आठवड्यात निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार केला जाणार आहे.