...अखेर नाशकातील क्लासेसही झाले सुरु!

कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचा निर्णय
...अखेर नाशकातील क्लासेसही झाले सुरु!

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सरकारला अनेकवेळा निवेदने देऊन, आंदोलने करुन काहीही लक्ष दिले जात नसल्याने, अखेर शाळा कॉलेजांबरोबरच, त्यांच्याच नियम व अटींच्या अधिन राहून, शहर व जिल्ह्यातील बहुतांश क्लासेससंचालकांनी आपापले क्लासेस सोशल डिस्टंन्सिग (Private classes started in Nashik) ठेवून सुरू केले आहेत....

मुख्यमंत्री (Chief Minister), पालकमंत्री (Guardian Minister) यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा अनेकवेळा पत्रव्यवहार करुन शाळा कॉलेजांबरोबरच, कोचिंग क्लासेसलाही ऑफलाईन सुरू करण्यास परवानगी द्यावी, यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. परंतु उच्चपदस्थांनी याकडे लक्ष न दिल्याने, क्लासेसचा उल्लेख करुन शासनादेश काढलेला आला नाही. त्यामुळे शेवटी पालकांच्या विनंतीवरून व छोट्या व मध्यम क्लासेसचालकांचे हित लक्षात घेऊन, नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस (Nashik district coaching classes) संचालक संघटनेची तातडीची बैठक घेवून निर्णय घेण्यात आला.

यावेळीशहर व जिल्ह्यातील बहुतांश क्लासेससंचालक उपस्थित होते. क्लासेस सुरु करण्याच्यादृष्टीकोनाने पालकांबरोबरच, क्लासेसशिक्षकांनाही विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी असल्याने, सर्व शिक्षकांनी लस घेतली असुन, वर्गात आल्यानंतर ताप मोजणे, सॅनिटायझरचा वापर, एका बेंचवर एकच विद्यार्थी, पालकांची संमती, आजारी मुलांना येऊ न देणे या व अशा इतर शासकीय नियमानुसार क्लासेस सुरु करण्याचे ठरले. त्यानुसार दि.०४ पासूनच अनेक क्लासेस सुरु झाले आहेत.

गेल्या दीड वर्षापासून क्लासेस बंद होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीबरोबरच, क्लासेससंचालकांचेही खुप आर्थिक हाल चालू होते. कर्ज, क्लासभाडे, घरगुती व आजारपणाचे खर्च यामुळे अनेक क्लासेसचालक अडचणीत आहेत. ऑनलाईनला चांगला प्रतिसाद मिळत नाही व सरकार अधिकृत परवानगी देत नाही. शासनाने शाळा महाविद्यालयांना परवानगी दिली व त्यांचे वर्ग प्रत्यक्ष सुरू झाले, याचे आकलन करून, संघटनेची तातडीची बैठक घेऊन, त्याच अटीशर्तींसह क्लासेस चे वर्ग घेण्याचे ठरले. आता शासनाने त्वरित स्वतंत्र आदेश काढावा ही विनंती.

जयंत मुळे,अध्यक्ष, नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com