कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे पुरस्कार जाहीर

कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे पुरस्कार जाहीर
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

येथील नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना (Nashik District Coaching Classes Directors Association) व सपकाळ नॉलेज हब (Sapkal Knowledge Hub) यांच्या संयुक्त विद्यमाने जीवनगौरव व आदर्श शिक्षक पुरस्कार (Award) आज जाहीर करण्यात आले...

शिक्षक सन्मान सोहळा आणि 10 वी, 12 वीत विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्या प्रमुख उपस्थितीत जूनच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. पुरस्कारांची घोषणा संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे व सपकाळ नॉलेज हबचे संचालक रविंद्र सपकाळ यांनी केली.

32 वर्षे अध्यापनाचे कार्य केलेले उद्धव अकॅडमीचे संचालक सुधीर गायधनी (Sudhir Gaidhani) यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. आदर्श शिक्षक पुरस्कारांमध्ये परांजपे संस्कृत क्लासेसच्या संचालिका सुषमा परांजपे, नील काबरा अकॅडमीच्या विशाखा काबरा, ब्रिलीयन्स अकॅडमीचे अमिर शेख, परांजपे प्रोफेशनल अकॅडमीचे कौस्तुभ परांजपे, आयडियल कोचिंग क्लासेसचे विनीत पिंगळे, ब्रेनोव्हा अकॅडमीचे किरण खाडे, ज्ञानामृत क्लासेसच्या विद्या राकडे, जुगल जोशी कॉमर्स अकॅडमीचे जुगल जोशी, पिनाकल एज्युकेशनचे मायकेल फर्नांडिस, सेवन्थ सेन्स अकॅडमीचे विष्णू चव्हाण, करिअर मंत्रा, बालाजी कॉमर्स अकॅडमीचे विक्रम बालाजीवाले, संदीप सायन्स इन्स्टिट्यूटचे संदीप घायाळ,

साईकृष्णा कोचिंग क्लासेसचे सागर परेवाल, अरिहंत कॉमर्स क्लासेसचे मनिष शहा, स्कॉलर्स हब क्लासेसच्या आरती खाबिया, डेस्टिनी प्लॅनर्सचे योगेश बाहेती (करियर एक्सलन्स) , नेक्स्ट स्टेप सायन्स क्लासेसचे दीप देवरे, निरंकारी क्लासेसचे महेश थोरात यांचा समावेश आहे.

तर युवा आदर्श शिक्षक पुरस्कार येवल्याच्या युनिक इंजिनिरींग क्लासेसचे शंकर कुंभार्डे, पंचवटीतील व्हिक्टर क्लासेसचे दुर्गेश तिवारी यांना जाहीर झाले आहेत.

निवड समितीत अण्णासाहेब नरुटे, पवन जोशी, गणेश कोतकर यांचा समावेश होता. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष अशोक देशपांडे, सरचिटणीस लोकेश पारख, निलेश दूसे, संजय अभंग, मुकुंद रनाळकर, अतुल आचळे, कल्पेश जेजुरकर, विलास निकुंभ, प्रमोद गुप्ता, किशोर सपकाळे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com